मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
दोन आरोपीवर कारवाई करित २ दुचाकी व ४ बो-या कोळसा असा ३८८०० रू. चा माल जप्त.
कन्हान (नागपुर) : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि खदान खदान नंबर चार येथुन जाणा-या पिपरी रोड वर दोन आरोपी कामठी खुली खदान डंम्पींग यार्डचा कोळसा चोरुन आपल्या दुचाकी वाहनाला बांधुन नेतांना वेकोलि सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन्ही आरोपीला पकडुन त्यांच्या जवळुन कोळसा आणि वाहना सह एकुण ३८,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोस्टे कन्हान ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
बुधवार (दि.१) फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता दरम्यान वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी रविकांत रामदास कंडे वय ४५ वर्ष रा चनकापुर कॉलोनी खापरखेडा व सुरक्षा रक्षक संतोष इंद्रासण यादव वय ४० वर्ष रा. दुर्गा मंदिर जवळ खदान नंबर ३ यांचे सोबत पेट्रोलिंग करीत असतांना ४ नंबर खदान कडुन पिपरी गावाकडे डंपींग यार्ड जवळ दोन ईसम आपल्या दुचाकी वाहनावर दोन – दोन बो-या दगडी कोळसा बांधुन घेऊन जातांनी आढळले. सुरक्षा अधिकारी यांनी हटकले असता १) शिशुपाल भिमराव टेलुटे वय ४२ वर्ष रा. अशोक नगर कन्हान दुचाकी वाहन क्र. एम एच ४० बी यु – २५४० हिरोहोंडा स्प्लेंडर अंदाजे किंमत १७,००० रु व २ बोरी दगडी कोळसा १४० किलो किंमत अंदाजे ८४० रु असा एकुण १७,८४० रुपयाचा मुद्देमाल तसेच २) इंदर रामजी सोनेकर वय ४० वर्ष रा. हरीहर नगर कांद्री दुचाकी वाहन क्र. एम एच ४० ई डब्लु ९४५२ हिरो होंडा शाईन किंमत अंदा जे २०,००० रुपये आणि २ बो-या दगडी कोळसा १६० किलो किंमत अंदाजे ९६० रु असा एकुण २०,९६० रुपये असा एकुण ३८,८०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदर घटनेबाबत दोन आरोपीला विचारले असता त्यांनी कामठी खुली खदान डंम्पींग यार्ड मधुन कोळसा चोरुन घेऊन जात असल्याचे कबुल केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी रविकांत कंडे यांच्या तक्रारीने पोस्टे ला आरोपी १) शिशुपाल भिमराव टेलुटे, २) इंदर रामजी सोनेकर यांच्या विरुद्ध कलम ३७९ , ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीना सुचना पत्र देऊन सोडुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पो हवा अरुण कुमार सहारे, पोहवा गुरूप्रकाश मेश्राम हे करीत आहे .