नागपूर : जलपुरवठा बंद असतानाही सहा महिन्यांपासून नियमित बिल पाठविणाऱ्या नागपूर महापालिकेविरुद्ध अधिवेशनकाळात उपोषण करण्याची पाळी वर्धा रोडवरील कन्नमवारनगरच्या काही नागरिकांवर आली आहे.
एका भागातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. पण त्याची दुरुस्तीही केली जात नाही आणि पर्यायी व्यवस्थाही नाही. बिल मात्र नेमाने दरमहा दिले जाते. या त्रासाला कंटाळून विधानसभेसमोर उपोषण करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला असल्याचे राजेंद्र कुलकर्णी, सुभाषचंद्र लांजेवार, ज्योती साठे आदींनी जाहीर केले आहे.