अमरदिप बडगे , प्रतिनिधी
तिरोडा – अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला पाऊस शहरात जाेरदार बरसरला. मात्र या पावसाने पालिकेसह स्मार्टसिटीच्या वतीने केलेेले निकृष्ट कामाचे पितळ उघडे पाडले.
जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील संत रविदास वार्ड चंद्रभागा नाका भागात सोमवारी दि.04 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा निचराच हाेत नसल्याने या परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांना साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी माेठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे . पहिल्याच पावसात शहरात अशा प्रकारे ठिकठिकाणी पाणी साचून तळे बनल्याने पालिकेच्या कारभारावर नागरिकांकडून चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.
संत रविदास वार्डातील नालीची उचाई कमी असल्यामुळे सोमवारी दि.04 जुलै रोजी झालेल्या संततधार पावसामुळे नालीच्या वरून पाणी वाहल्याने अनेक दुकानासह घरामध्ये पाणी शिरल्याने लोकांना चांगलाच संताप झालेला आहे .या नालीची उंचाई वाढविण्या बाबत नगरपरिषदेला वार्डातील नागरिकांकडून निवेदन देण्यात आलेले होते. सदर निवेदन बाबत नगरपरिषदेने बांधकाम करणाऱ्यासाठी साहित्य सुध्दा टाकले आहे परंतु काम सुरू केलेले नाही. या प्रकारामुळे काेट्यवधी रुपये खर्च करत स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात आलेल्या कामाच्या गुणवत्तेवरच नागरिकांकडून आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पालिकेविरोधात व्यापाऱ्यांचा रोष
स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरात ठिकठिकाणी खाेदकाम करण्यात आलेले आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांना माेठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे . मात्र पावसाळ्याच्या सुरुवातील शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने स्मार्ट सिटीने नेमके काेणते काम केले, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी काय उपाययाेजना केल्या असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.तर दुसरीकडे पालिकेच्या वतीने देखील पावसाळ्यापूर्व काेणतेही काम न केल्याने अशी परिस्थिती उदभवली असल्याने प्रशासकांनी या प्रकाराकडे गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.