जलप्रदूषण व वायू प्रदूषणाने सजीव धोक्यात-नरेश वाघमारे

संदीप कांबळे, कामठी
वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाने साधुया नैसर्गिक समतोल
कामठी ता प्र 21:-बेसुमार वृक्षतोड , जलप्रदूषण व वायुप्रदूषण यामुळे पर्यावरण धोक्यात आले आले असून त्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंगोपन करून नैसर्गिक समतोल राखण्याची आता खरी गरज निर्माण झाली असल्याचे मत वंचित बहुजन आघाडी चे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष नरेश वाघमारे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
जमिनीवरील झाडांची संख्या कमी होत आहे.मातीचे प्रमाण कमी होत चालले आहे आणि जमिनीची धूप थांबविणारे घटकच उरले नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबविला नाही तर येत्या काही दिवसात सृष्टीवरील प्राणिमात्रासाठी घातक ठरण्याची शक्यता पर्यावरण तज्ञाकडूनही वर्तविली गेली आहे.पृथ्वीवरील हवामान हे अनेक घटकांवर अवलंबून असते .ज्याप्रमाणे सृष्टुवरील जीवाला जगण्यासाठी पाच तत्वाची आवश्यकता असते त्यात वायू, जल, अग्नी, पृथ्वी व आकाश हे पाच तत्व संमतोलपणे जीवाला जगण्यासाठी हवे .यामध्ये एकही तत्व कमी जास्त झाले तर समतोल बिघडून जीव धोक्यात येत असतो तसेच पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी नैसर्गिक समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसांगोपन करणे ही काळाची गरज झाली आहे.
-पहाटेची हवा लाख मोलाची दवा-
पाण्यात प्रदूषण , हवेत प्रदूषण यामुळे नागरिकांना विविध आजाराला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे आधुनिक युगातील युवकांचे आयुष्य घटत चालले आहे.पूर्वीच्या काळात ऋषीमुनी झाडाखाली बसून अनेक वर्षे तपश्चरया करीत असायचे .कधी वृक्षाचे पान खाऊन तर कधी फळे खाऊन आपली दिनचर्या करून शंभर वर्षाच्यावर आयुष्य जगायचे .वाईट विचारांचा त्याग करुन चांगले विचार मनात धारण करायचे.पहाटेला सुर्योदयापूर्वीच उठुन फिरायला जायचे म्हणूनच एकाने म्हणून चुकले ‘पहाटेची हवा आणि लाख मोलाची दवा.’हे तेवढेच खरे आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

'राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता' स्पर्धेचा पुरस्कार मनपाला प्रदान

Thu Apr 21 , 2022
मुख्यमंत्र्यांकडून मनपा आयुक्तांनी स्वीकारला पुरस्कार नागपूर, ता. २१ : राज्य शासनातर्फे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेचा द्वितीय पुरस्कार नागरी सेवा दिनी बुधवारी (ता.२०) नागपूर महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला. बुधवारी (ता.२०) नागरी सेवा दिनानिमित्त मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनपा आयुक्त व प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मंचावर मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,  […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com