संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
युवक काॅंग्रेस पदाधिकारी व नागरिकांचे न प मुख्याधिकारी हयांना निवेदन.
कन्हान : – नगरपरिषद अंतर्गत प्रभागात पाण्याची समस्या मागील दोन महिन्या पासुन वाढली असुन सुद्धा नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करित असल्याने युवक काॅंग्रेस पदाधिकारी व नागरिकांनी न प मुख्या धिकारी राजेंन्द्र चिखलखुंदे यांना भेटुन या गंभीर विषयावर चर्चा करून त्यांना निवेदन देऊन पाण्याची समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी करून त्वरित न सोडविल्यास तीव्र आंदोलनाचा ईशारा.
नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत प्रभाग क्र ७ येथील पटेल नगर, शिवाजी नगर, स्वामी विवेकानंद नगर सह आदी इतर प्रभागातील नागरिकांना मागील दोन महिण्यापासुन पाणी नियमित मिळत नाही. ही समस्या मागील अनेक वर्षापासुन असुन सुद्धा नगर परिषद प्रशासन या समस्येला गांभीर्याने लक्ष केंन्द्रीत न करित असल्याने युवक काॅंग्रेस पदाधिकारी व नाग रिकांनी नप नगरसेविका रेखा टोहणे यांच्या नेतृत्वात नप मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे यांना भेटुन या गंभीर पिण्याच्या पाण्याच्या समस्येच्या विषयावर चर्चा करून त्यांना निवेदन देऊन पाण्याची समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली. असता मुख्याधिकारी यानी तीन ते चार दिवसात सोडविण्याचे आश्वासन दिले. अन्यथा पाण्याच्या समस्येकरिता तीव्र आंदोलना चा ईशारा काॅग्रेस पार्टी च्या पदाधिका-यांनी यावेळी दिला. याप्रसंगी नगरसेविका रेखा टोहणे, नगरसेवक विनय यादव, आकिब सिद्धिकी, अजय कापसीकर, प्रशांत मसार, सुनील मानकर, बालाजी नागपुरे, पुष्पा उमरकर, प्रमिला भगत सह नागरिक उपस्थित होते.