नागपूर :- पोलीस ठाणे बल्लारशाह, जि. चंद्रपूर येथील कलम १०९, ११८, ३२६ (जि), ६(२) भा.न्या.सं. सहकलम ३(अ) बारी पदार्थ अधिनीयम १९०५ मधील पाहिजे आरोपी हा त्याचे पांढऱ्या रंगाचे डस्टर कारने नागपूर शहरातील मानेवाडा परिसरात असल्याचे प्राप्त माहितीवरून गुन्हेशाखा युनटि क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन आरोपी नामे निरज संतोष गुप्ता, वय २६ वर्षे, रा. श्रीराम वार्ड, गांधी चौक, बल्लारशाह, जि. चंद्रपूर यास ताब्यात घेतले. आरोपी सोवत महिला नामे सोफीया अयुब शान वय ३५ वर्ष रा. श्रीराम वार्ड, गांधी चौक, बल्लारशाह, जि. चंद्रपूर, ह.मु नुर खान यांचे घरी, राहणार आशीयाना, फ्लॅट नं. २२५, पोलीस ठाणे पाचपावली, नागपूर हया मिळुन आल्याने त्यांचे बाबतीत विचारपूस केली असता, नमुद महिला हया पाचपावली येथुन मिसींग असुन दि. २९.०६. २०२४ ला पोलीस ठाणे पाचपावली येथे मिसींग तकार दाखल आहे. गुन्हयातील पाहिजे आरोपी यास पोलीस ठाणे बल्लारशाह येथील पथकाचे ताब्यात देण्यात आलेले आहे. व नमुद महिलेस पुढील कारवाईस्तव पाचपावली पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शखाली, गुन्हेशाखा युनिट क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी केली.