संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त बुशिंत दो कराटे असोसिएशन तर्फे 9 ते 16 एप्रिल पर्यंत कामठी शहरात ‘स्पोर्ट्स अँड कल्चरल विक’साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार काल 9 एप्रिल ला सकाळी 6.30 वाजता कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे परिसरात ‘वॉकथॉन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत 30 ते 40 वर्षे वयोगटा पासून ते 70 ते 80 वर्षे वयोगटातील महिला पुरुषांनी सहभाग नोंदविला होता.यातील विजेत्याना प्रथम व द्वितीय व तृतीय पुरस्काराने निवड करण्यात आली.
या वॉकथॉन स्पर्धेचा शुभारंभ कर्मविर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या पुतळ्या जवळून ऍड डी सी चहांदे व सेन्सई जयंत कांबळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.स्पर्धेत सहभागी झालेले 30 ते 40 वर्षे वयोगटातील महिला प्रथम म्हणून सविता वासे,द्वितीय म्हणून पूनम गेडाम तर तृतोय म्हणून माधुरी उके विजयी झाले तसेच 40 ते 50 वयोगटात स्मिता थोरात(प्रथम),मनीषा थुले(द्वितीय),पुष्पां कडबे(तृतीय),50 ते 60 वर्षे वयोगटात सुजाता बावंनगडे (प्रथम),विद्या भीमटे (द्वितोय),रेखा मेश्राम(तृतीय),60 ते 70 वर्षे वयोगटात हेमलता गेडाम (प्रथम),द्रौपदी गेडाम(द्वितीय),तर सुशीला चव्हाण तृतीय क्रमांकाने विजयी झाले.
तर पुरुष वर्गात 40 ते 50 वर्षे वयोगटात पंकज थोरात (प्रथम),दिनेश वासे(द्वितीय),मनोज मेश्राम(तृतीय),50 ते 60 वर्षे वयोगटात राष्ट्पाल गजभिये(प्रथम),आनंदकुमार अस्वले (द्वितीय),नितीन गजभिये(तृतीय),60 ते 70 वर्षे वयोगटात नरेंद्र खोब्रागडे(प्रथम),अनिल बेंदले(द्वितीय)तर नीरज नागदेवें तृतीय क्रमांकाने निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रमोद खोब्रागडे,जेता फुलझेले, विकास रंगारी, उदास बन्सोड, संजय चौरे, योगेश गोंडाने, अभिषेक चहांदे, कमल तांडेकर, अभिषेक चिमनकर, वैभव चिमनकर, भोयर, रितेश बागडे,आशुतोष वासे,युवराज बोरकर, स्वयंम बागडे,रंजित माटे ,आशिष गेडाम,रितेश सवाइतुल, इत्यादींनी मोलाचे परिश्रम घेतले.