वडसा वन विभागातील पोर्ला वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचा मृत्यू

गडचिरोली,(जिमाका)दि.6: वडसा वनविभागाअंतर्गत पोर्ला परिक्षेत्रातील पोर्ला उपक्षेत्रातील नियत क्षेत्र साखरा मधील काटली गावाचे तलावाजावळ नर वाघाचा मृत्यू झाल्याची घटना दि. 05 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 6.00 वाजेदरम्यान वनविभागाच्या निर्देशनास आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी तसेच मानद वन्यजीव सुक्ष्म गडचिरोली श्री. मिलींद उमरे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व NTCA चे प्रतिनिधी तात्काळ घटना स्थळी उपस्थित झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचा ( SOP) अनुसार मौका स्थळाच्या आजुबाजूस 500 मीटर परिसरातील संपूर्ण क्षेत्र पुरावा शोधण्याकरीता तपासून पाहण्यात आले. प्राथमिक तपासणीवरुन सदर वाघाचा मृत्यू दोन वाघांच्या झुंजीत झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दिनांक 06 जानेवारी 2022 रोजी सकाळी आठ वाजता मृत वाघाच्या मौका स्थळी पंचनामा नोंदवून मृत वाघ पोर्ला वन परिक्षेत्र कार्यालय परिसरात आणून उपवनसंरक्षक वडसा विभागीय वन अधिकारी (दक्षता), गडचिरोली वनवृत्त सहाय्यक वनसंरक्षक वडसा, वनपरिक्षेत्र अधिकारी पोर्ला, मानद वन्यजीव रक्षक गडचिरेाली यांचे उपस्थितीत पशु वैद्यकीय अधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, डॉ. रविकांत खोब्रागडे, डॉ.व्ही. एस.लेखामी पशु वैद्यकीय अधिकारी, गडचिरोली व पशु वैद्यकीय अधिकारी पोर्ला डॉ. बी.आर. रामटेके यांचे चमुने मृत वाघाचे शवविच्छेदन करतांना मृत वाघांच्या मानेवर व पायाला झुंजीतील दुसऱ्या वाघाच्या चाव्यांच्या जखमा दिसून आले. तसेच सदरील वाघ अंदाजे 3 ते 4 वर्षाचा असावा.
शवविच्छेदनाची संपूर्ण प्रक्रिया सकाळी 10.00 वाजता सुरु करुन दुपारी 12.00 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12.00 वाजता मृत वाघाला दहन करण्यात आले. असे उपवनसंरक्षक वडसा वनविभाग वडसा यांनी कळविले आहे.
– सतीश कुमार

गडचिरोली

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

आज दि. 06-01-2022 नागपुर जिले में कुल 441 कोविड पॉजिटिव नए मरीज़ मिले

Thu Jan 6 , 2022
गुरुवार 06 जनवरी 2022 नागपुर जिले में नए मरीज मिले 441 ग्रामीण 39 शहर 379 बाहरी जिला 23 ***** कुल मौत 0 ग्रामीण 0 शहर 0 बार जिला 0 ***** कुल ठीक हुए 33 ग्रामीण 5 शहर 19 बाहरी जिला 9 ***** वर्तमान में एक्टिव मरीज कुल 1484 ग्रामीण 160 शहर 1266 बाहरी जिला 58   Follow us on Social […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com