वाडीत ठिकठिकानी संविधान दिवस व  मुंबई शहीद दिवस कार्यक्रमाचे आयोजन! संविधाना ने दिली सर्वांना प्रगतीची संधी!- प्रा.डॉ.अनुपम पांडे,अधिवक्ता सुप्रीम कोर्ट!

वाडी( सं) – भारतीय संविधानाचा 72 वा वर्धपान दिवस वाडी दत्तवाडी परिसरात सामाजिक  संघटना व शाळा महाविद्यालयात उत्साहत सम्पन्न झाला.भारतीय संविधानाने देशातील सर्व समाज घटकाला विकासाची समान संधी,अधिकार दिले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले हे संविधान जगात उत्कृष्ठ आहे.त्यामुळेच संविधानाची सुरक्षा व सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असल्याचे महत्वपूर्ण प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्राचार्य डॉ.अनुपम पांडे यांनी गजानन सोसायटी क्रीडा मैदानावर अ.भा तेली समाज संघटन,डॉ.आंबेडकर विचार विकास समिती द्वारे आयोजित संविधान कार्यक्रमात विचार व्यक्त करीत होते.तेली समाज संघटने तर्फे त्यांचे पुष्पगुच्छ व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.तेली समाज संघटनेचे विभागीय सचिव अनिल बाजाईत यांनी ओबीसी समाजाच्या विकास व प्रबोधनासाठी भारतीय संविधान समजून घेणे गरजेचे झाले असल्याचे सांगितले.केंद्रीय पेन्शनर्स नेते पी के मोहनन यांनी ही समयोचित मार्गदर्शन केले.प्रा सुभाष खाकसे यांनी सर्वांना संविधान प्रस्ताविकेचे वाचन करविले.तर आभार प्रदर्शन संघटनेचे उपाध्यक्ष रोशन वैद्य यांनी केले.
 कार्यक्रमाला विभागीय महीला उपाध्यक्ष सौ ममताताई बजाईत, विभागीय सहसचिव चेतन वरटकर, वाडी महीला अध्यक्षा वैशाली दहाघाणे, उपाध्यक्ष सौ सुरेखाताई अवचट,सचिव रिनाताई कामडी, कार्याध्यक्षा भारतीताई वंजारी,संपर्कप्रमुख मयुरीताई भुरे,सौ मिराताई भुरे,सौ राखीताई सरोदे,सौ स्वातीताई बारई,सौ वर्षाताई मेहेरकुळे,वाडी कार्याध्यक्ष गजानन वैद्य,देवबाबु कामडी,मनोज भुरे,सूरज सरोदे, सदस्य चंन्द्रकांतजी लांजेवार,अनील दहाघाणे,ओमदेवजी लांबट ,उमेशजी गोमासे,मस्केजी,साहु सर,प्रमोदजी येळणे,किशोर पराडकर, तथा हिरामण मेश्राम,डी एम कोल्हे,प्रल्हाद लाडे,चंद्रशेखर निघोट  पेन्शनर्स ,नागरीक उपस्थित होते.
*वाडी पत्रकार संघात ही डॉ.अनुपम पांडे यांनी डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण केले.व सामूहिक प्रास्ताविक वाचन करण्यात आले.पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तलमले,सचिव विजय वानखडे व इतरांनी त्यांना रोपटे देऊन सन्मानित केले.
खड्गाव मार्गावर शिवराजे प्रतिष्ठान व ढोल ताशे पथकातर्फे संविधान दिवस व मुंबई स्थित 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्याना आदरांजली व मानवंदना देण्यात आली.वेल ट्रीट हॉस्पिटल चे संचालक डॉ. राहुल ठवरे,डॉ.अनुपम पांडे ,प्रा.सुभाष खाकसे,अरुण कराडे ,सुरेश फलके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान दिनानिमित्य डॉ.आंबेडकर यांच्या छाया चित्राला माल्यार्पण केले.व सर्वांनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले.डॉ.अनुपम पांडे यांनी उपस्थित युवका समोर समयोचित विचार व्यक्त केले .तसेच 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहिदांच्या तस्वीरी समक्ष अतिथी व युवकांनी मेणबत्ती प्रजवलीत करून ,व मौन धारण करून आदरांजली अर्पित केली. आयोजक शिवराजे फाउंडेशन चे अध्यक्ष शुभम डवरे यांनी संचलन तर संस्थापक लोकेश जगताप यांनी आभार व्यक्त केले.पदाधिकारी संकेत कुंभलकर,विशाल जोध, निशांत झाडे, राहुल अतकरी,रुपेश नवकरकर, ऋषी सहारे, मयूर वानखडे,श्रद्धा गोंडेकर,विधी कोरे,भूमी डोंगरे,प्रगती सेलोकर,श्रुती पाचोडे सहभागी झाले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

विधान परिषद चुनाव निर्विरोध नहीं - भोयर का मुकाबला बावनकुले से होना तय

Sun Nov 28 , 2021
नागपुर –राज्य विधान परिषद चुनाव (महाराष्ट्र विधान परिषद चुनाव 2021) के लिए कोल्हापुर, धुले-नंदुरबार और मुंबई की दो सीटों पर निर्विरोध निर्वाचित हो गए हैं. हालांकि नागपुर विधानसभा चुनाव नागपुर में होगा। यह मुकाबला भाजपा के चंद्रशेखर बावनकुले और कांग्रेस के रविंद्र भोयर के बीच जबरदस्त होने के आसार हैं। इस बात की जानकारी कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com