– त्रिर्मुती चौकात सादरीकरण
भंडारा :- गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्हयात 67.04 टक्के मतदान झाले. शहरी भागात मतदानाविषयी असणारी अनास्था आढळून आल्याने जिल्हयात मोठया प्रमाणावर मतदान जागृतीचे कार्यक्रम सुरू आहेत.त्यातच काल शहरातील मुख्य त्रिर्मुती चौकात फलॅश मॉबव्दारे मतदान करण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. या फ्लॅश mob मधे महिला समाज शाळेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी,उपजिल्हाधिकारी निवडणुक प्रशांत पिसाळ तसेच नोडल अधिकारी स्वीप रविंद्र सलामे, नायब तहसीलदार रोशनी दिघोरे यासह अन्य विभागप्रमुख उपस्थित होते. या फ्लॅश मॉबनंतर शिवाजी क्रीडा संकुल मध्ये जिल्हास्तरीय मतदार जागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये मतदार जागृती सक्रिय सहभागी येणाऱ्या तसेच जिल्ह्याचे मतदानासाठी ब्रँड अँबेसिडर असणाऱ्या सदिच्छा दूतांची देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी समृद्ध लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी देखील शहरी भागामध्ये मतदानाप्रती विधानसभा दिसून येते यावेळी भंडारा जिल्ह्यातून आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्वीप ऍक्टिव्हिटी राबवण्यात येत असल्याचे सांगितले.