मतदार यादी पुनरीक्षणासंदर्भात दहाही झोनमध्ये बैठक

झोन सभापती, नगरसेवक, झोनचे सहायक आयुक्त व नागरिकांची उपस्थिती


नागपूर  : नागपूर महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत बुधवारी (ता.२४) मनपाच्या दहाही झोनमध्ये बैठक घेण्यात आली. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये संबंधित झोनचे झोन सभापती, झोनमधील नगरसेवक, सहायक आयुक्त आणि प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

            महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिका-यांनी १ जानेवारी २०२२ या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादीचे संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासंदर्भात ऑनलाईन बैठक घेतली होती. त्यामध्ये बुधवार, २४ नोव्हेंबर २०२१ रोजी नागपूर महानगरपालिकेद्वारे सर्व झोनमध्ये विशेष बैठक घेण्याबाबत सुचित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिका-यांमार्फत मनपा आयुक्तांना यासंदर्भात सुचित करण्यात आले. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यावर तातडीने अंमलबजावणी करीत सर्व झोनच्या सहायक आयुक्तांना बैठक आयोजित करण्यासंदर्भात निर्देश दिले. त्यानुसार बुधवारी लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या दहाही झोनमध्ये सहायक आयुक्तांद्वारे सर्व सभापती, नगरसेवक, झोनमधील प्रतिष्ठीत नागरिकांची बैठक घेण्यात आली.

            सहायक आयुक्त गणेश राठोड यांच्या नेतृत्वात लक्ष्मीनगर झोनमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत झोन सभापती पल्लवी शामकुळे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांच्या नेतृत्वात धरमपेठ झोनमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत झोन सभापती सुनील हिरणवार, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, यांच्या नेतृत्वात हनुमान नगर झोनमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत झोन सभापती कल्पना कुंभलकर, सहायक आयुक्त किरण बगडे यांच्या नेतृत्वात धंतोली झोनमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत झोन सभापती वंदना भगत, सहायक आयुक्त हरीश राउत यांच्या नेतृत्वात नेहरूनगर झोनमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत झोन सभापती स्नेहल बिहारे, सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात गांधीबाग झोनमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत झोन सभापती श्रद्धा पाठक, सहायक आयुक्त घनश्याम पंधरे यांच्या नेतृत्वात सतरंजीपुरा झोनमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत झोन सभापती अभिरुची राजगिरे, सहायक आयुक्त विजय हुमणे यांच्या नेतृत्वात लकडगंज झोनमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत झोन सभापती मनिषा अतकरे, सहायक आयुक्त अभिजित बावीस्कर यांच्या नेतृत्वात आशीनगर झोनमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत झोन सभापती वंदना चांदेकर, सहायक आयुक्त विजय हुमने यांच्या नेतृत्वात मंगळवारी झोनमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत झोन सभापती प्रमिला मथरानी यांच्यासह संबंधित झोनचे नगरसेवक व नगरसेविका प्रामुख्याने उपस्थित होते.

            बैठकीत मृत मतदारांची माहिती गोळा करून नमुना ७ भरून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागांमधील मृत मतदारांची माहिती गोळा करण्यासंदर्भात महत्वाचे सहकार्य मिळणार असून त्याबाबत सर्व नगरसेवकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची हमी दिली. याशिवाय मतदानासह पात्र व्यक्तींचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठीही सहकार्य करण्याबाबत सर्व नगरसेवकांद्वारे सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. बैठकीत संबंधित बीएलओ, मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी देखील उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

आत्मनिर्भर भारता'साठी कृषिविकासास प्राधान्य द्यावे- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Thu Nov 25 , 2021
अमरावती : देश सर्वार्थाने आत्मनिर्भर होण्यासाठी कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यास प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख यांचा शेतीविकासाचा संकल्प कृतीत आणण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समर्पित भावनेने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.             येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com