मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन

मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन उभारले आहे. या दालनात मतदार यादी, मतदार नोंदणी, निवडणूक यासंबंधी माहिती इथे येणाऱ्या अनुयायांना मिळणार आहे.

गेल्या वर्षभरात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात आलेली आणि डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेली ‘लोकशाही समजून घेताना’ आणि ‘कशासाठी ? लिंगभाव समतेसाठी’ ही पुस्तके तसेच, निवडणूक आयोगाची निवडणुकीसंबंधी विविध प्रकाशने प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत.

निवडणूक प्रक्रिया , आचारसंहिता यासंबंधीचे ल्यूडो, सापशिडी हे खेळ दालनात ठेवण्यात आले आहेत. या खेळांतून मतदार जागृती करण्याचा मानस असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी चे टपाल कार्यालय दिव्यांग्यासाठी ठरतेय डोकेदुखी

Mon Dec 5 , 2022
कामठी :- 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन सर्वत्र साजरा करण्यात आला असला तरी मागील 40 वर्षांपासून कामठी च्या मध्यभाग असलेल्या गुड ओली स्थित भाड्याच्या खोलीत कार्यरत असलेले कामठी पोस्ट ऑफिस दिव्यांग्यासाठी अजूनही उपेक्षित राहलेला आहे.ज्याकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहरात असलेले पोस्ट कार्यालय पहिल्या माळ्यावर असल्याने पोस्टात येणार्‍या जेष्ठ नागरिकांची व पोस्टातील वरिष्ठ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com