बेला : विमलबाई तिडके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य राजेंद्र तिडके होते . यावेळी ज्येष्ठ शिक्षक महेंद्र महाले मंचावर उपस्थित होते .मान्यवरांनी विवेकानंद व जिजाऊ माता यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानिमित्त मुख्याध्यापक व महाले यांनी विद्यार्थ्यांना विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचे जीवन कार्याची माहिती सांगितली. प्रास्ताविक रविकर गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन संदिप शहाणे यांनी केले. विद्यार्थी पियूष फूलपाटील,पियांष रोडे, नेहा रोडे,स्नेहा शेंदरे या विद्यार्थ्यांनी युवा दिनाविषयी आपले मत भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता आर.बी.महाले यांचे समारोपीय भाषणाने झाली. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी जयंती सोहळ्याला उपस्थित होते.