नागपूर :- महारेशीम अभियानाची जिल्ह्यात सुरुवात झाली असून या अभियानअंतर्गत हिंगणा तालुक्यातील मौजे सावंगी देवळी, मौजे सावली, बिबी येथील महिला गटातील शेतकरी यांनी रेशीम शेतीतील प्रगतिशील शेतकरी दिनेश नारायण लोखंडे यांचे गुमगाव येथील रेशीम शेतीस प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचेकडून रेशीम शेतीबाबत माहिती घेतली.
या भेटीदरम्यान रेशीम शेतकरी बंडूजी निवंत, रेशीम कार्यालयाचे भास्कर उईके, महिला आर्थिक विकास महामंडळाचे अमोल नारनवरे,जोत्सना नगरारे, कल्याणी कोसरे, माधुरी दंडारे उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणात इतर शेतीचा तुलनेत रेशीम शेतीचे महत्व पटवून त्यांना रेशीम शेती करण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.