नागपूर :- विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी तेथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत सामाजिक समरसता विभागाचे देवजीभाई रावत, स्मारक ट्रस्टचे विश्वस्त विलास गजघाटे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या भुवनेश्वरी मेहेर प्रामुख्याने उपस्थित होते.
आजपासून विश्व हिंदू परिषदेच्या समरसता विभागाची अखिल भारतीय बैठक नागपुरात सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर बैठकीच्या पूर्वसंध्येला आलोक कुमार आणि सर्व क्षेत्रांचे सामाजिक समरसता अभियान प्रमुख यांनी दीक्षाभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासोबतच तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. परिसरात बोधीवृक्षाचे दर्शन केले. दीक्षाभूमी येथील प्रदर्शनीला भेट दिली. यावेळी आलोक कुमार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी समाजासाठी केलेले कार्य अतुलनीय असल्याचे म्हणत. याठिकाणी प्रसन्नता वाटत असल्याचे सांगत दीक्षाभूमी स्मारक समितीची प्रशंसा केली.
यावेळी माजी नगरसेवक प्रमोद तभाने, विदर्भ प्रांत समरसता प्रमुख संजय चौधरी, विदर्भ प्रांत प्रचार व प्रसार प्रमुख निरंजन रिसालदार, पुष्कर लाभे, आनंद मिश्रा, अविनाश इलमे, सुनील सोनडबले, पुरुषोत्तम डडमल उपस्थित होते.