महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाच्या संचालकपदी पारशिवनी चे वीरेंद्र गजभिये

पारशिवनी :- महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाच्या संचालक पदावर पारशिवनीचे वीरेंद्र गजमिये यांची नियुक्ती करण्यात आली . ते २०२२ ते २०२६-२७ पर्यंत वैद्य राहील . महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष व संचालक मंडळ महाराष्ट्रातील सुतगिरणी , पावरलुमची कामे , वस्त्रोद्योगातील समस्या , अडचणी सोडविण्यासाठी कार्य करीत असतात. येथील नवयुवक वीरेंद्र गजभिये हे निंबा येथील गौतम मागासवर्गीय कापुस उत्पादक सहकारी सुतगिरणी ( मर्या ) मध्ये २००१ पासून अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. सूत गिरणीच्या १९ ऑक्टोबर २०२२ ला झालेल्या निवडणुकीत ते चौथ्या अध्यक्ष पदावर विराजमान झाले व गिरणी संस्थापक / संचालक माजि मंत्री रणजित बाबू देशमुख यांच्या उपस्थितीत अध्यक्ष पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला. पदग्रहण समारंभ सोहळ्याला संचालक , सरपंच , प्रतिष्ठित व्यक्ती पत्रकार उपस्थित होते पदग्रहण सोहळा गौतम मागासवर्गीय कापुस उत्पादक सहकारी सुतगिरणी सभागृहात पार पडला . नवनियुक्त अध्यक्ष गजभिये यांनी रणजितबाबू देशमुख यांचे आभार मानले आहे .

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नेऊरवाड्यात आठ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प संतप्त ग्रामस्थांचे पारशिवनी तहसीलदारांना निवेदन

Sat Nov 26 , 2022
पारशिवनी :- तालुक्यातील मौजा नेऊरवाडा येथे गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने संतप्त महिलांनी आज सोमवारी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन रोष व्यक्त केला. ग्रामपंचायत नवेगाव खैरी अंतर्गत मौजा नेऊरवाडा येथील लोकसंख्या एक हजाराच्या जवळपास असून येथे जिल्हापरिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत जुनी पाणीपुरवठा योजना आहे. सदर योजनेची विहिर नदीकाठी असल्यामुळे ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com