संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर येथे एक दिवसीय विपश्यना शिबीर संपन्न
कामठी :- कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन केंद्र येथे आज 23 एप्रिल रोजी चैत्र पोर्णिमेच्या निमित्ताने सकाळी 9 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आयोजित एक दिवसीय भव्य विपस्यना ध्यान शिबिरात सहाय्यक आचार्या सुनीता शेंडे यांनी शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना मार्गदर्शन केले.
या शिबिरात प्रामुख्याने ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख ऍड सुलेखा कुंभारे ,रेखा भावे, रजनी लिंगायत ,सुकेशीनी मुरारकर, नंदा गोडघाटे यासह शेकडो च्या संख्येत विपस्वी साधकांनी सहभाग घेतला.ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर मध्ये 10 दिवस ,3 दिवस व दर पोर्णिमेला एक दिवसीय शिबिराचे आयोजन केल्या जात असते या शिबिरात मोठ्या प्रमाणात देशाच्या कानाकोपऱ्यातून साधक सहभागी होवून ध्यान शिबिराचा लाभ घेत असतात.
शिबिरामध्ये सहभागी होण्याकरिता साधकांना http://forms.gle./HWfPAahSQkXLnRw3Aया वेबसाईट च्या माध्यमातुन ऑनलाईन नोंदणी करता येते त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य व्यतिरिक्त इतर राज्यातुन सुद्धा ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर मध्ये ध्यान करण्याची संधी मिळत असून जगातील वर्तमान परीस्थितीत मनाच्या शांतिकरिता विपस्यना गरजेचे असल्याची माहिती ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर च्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ऍड सुलेखा कुंभारे यांनी दिली.