– राज्य सरकारच्या विरोधात मागास वर्गीयामध्ये आक्रोश
– दिक्षाभूमी स्मारक समिती बरखास्त करून दीक्षाभूमिचे आंबेडकरी जनतेने संचालन करावे
नागपूर :- राज्य शासनाने मागासवर्गीय समाजाला शैक्षणिक सुविधा पासून वंचित करून समाजाचे खच्चीकरण सुरु केले आहे. मागास वर्गी्यांना मिळणारी शैक्षणिक शिषवृत्ती, फ्री शीप बाबत शासनाचे धोरण मागासवर्गीय विरोधी आहे, नुकतीच परदेशी शिष्यवृत्ती बाबत घेतलेल्या निर्णयामुळे समाजात आक्रोश असून शासनाचे विरोधात आंदोलन करण्यासाठी व पुढील भूमिका ठरविण्यासाठी -काष्ट्राईब महासंघ, संविधान परिवार, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल व इतर सामाजिक संघटना प्रमुख यांची संयुक्तसभा अरुण गाडे, अध्यक्ष काष्ट्राइब महासंघ यांचे अध्यक्षतेखाली रवीभवन सभागृह, नागपूर येथे संपन्न झाली या सभेला राहुल मुन संविधान परिवार, अशोक बोन्दाडे, समता सैनिक दल, पद्माकर गणवीर, बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया, श्यामराव हाडके, प्रा एम एस वानखेडे,अब्दुल पाशा आर एस एस, ट्रायबल ऑफिसर फोरम चे आर डी आत्राम, सीटूचे कामगार नेते कॉ. राजेंद्र साठे, भाऊराव कोकणे, मच्छिन्द्र सावळी, वसंत पवार, अशोक पाटील, आर एस चव्हाण, सुरेश तामगाडगे, ऍड बी डी मेश्राम, कवी हृदय चक्रधर, राजेश ढेंगरे, अरुण साखरकर, प्रेमानंद कुंभारे, सुषमा भुजाडे, कैलास खोंडे असे २५ विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सभेत महाराष्ट्र सरकारच्या अन्यायकारी धोरणा विरोधात तसेच परदेशीं शिष्यवृती बाबत जाचक अटी रद्द कराव्या. या मागणी साठी येत्या २९ जुलै रोजी बेमुदत आंदोलन आझाद मैदान, मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून त्यासाठी आमरण उपोषण आंदोलन करण्याबाबत शासनाला रीतसर पत्र व्यवहार झाला असल्याची माहिती मा श्यामराव हाडके यांनी दिली. शासनाने मागास वर्गीयांचे विरोधातील धोरण बंद करावे व परदेशीं शिष्यवृत्तीच्या जाचक अटी रद्द करण्याचा निर्णय १५ दिवसात न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा विविध संघटनाचे प्रतिनिधीनी दिला. या आंदोलनात सहभागी होणाऱ्यासाठी मुंबईला राहण्याची व्यवस्था राजेंद्र साठे करणार आहेत. करिता जनतेनी लवकरात लवकर तिकीट कन्फर्म करावे असे आवाहन प्रा राहुल मुन यांनी केले. याप्रसंगी अरुण गाडे यांनी मुख्य सचिव यांची भेट घेऊन मागासवर्गी्यांबाबत शासन द्वारा होत असलेल्या अन्याय व परदेशी शिष्यवृत्ती बाबत जनतेचा आक्रोश मुख्य सचिव पर्यंत पोहचविण्या बद्द्दल तसेच या आंदोलनासाठी घेतलेल्या पुढाकारा बाबत विविध संघटनाचे वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
२९ जुलै च्या आंदोलनासाठी अशोक बोन्दाडे, राष्ट्रीय निमंत्रक समता सैनिक दल यांनी १० हजार रु. निधीचा चेक दिला.सर्व मागासवर्गीयच्या शैक्षणिक आर्थिक व सामाजिक भवितव्यासाठी ही लढाई आरपारची असून लढाई यशस्वी करण्यासाठी सर्व जनतेनी या आंदोलनात सहभागी व्हावे व तन मन धन देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. दिक्षाभूमी वर नुकत्याच झालेल्या आंदोलनाबाबत आंबेडकरी जनतेची भूमिका याबाबत बोलताना वक्त्यांनी दीक्षा भूमी स्मारक समिती व महाराष्ट्र शासन आंबेडकरी जनतेची फसवणूक करित आहे. दीक्षाभूमी स्मारक समिती बरखास्त करून बुद्धिस्ट सोसायटी व सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी यांनी दिक्षाभूमीचे संचलन आपल्या ताब्यात घ्यावे असे सर्वच वक्त्यांनी एकमताने घोषित केले. सभेचे संचालन सिताराम राठोड व आभार रवी पोथारे यांनी केले. संकलन सीताराम राठोड संघटक सचिव काष्ट्राइब महासंघ यांनी केले.