पवनगाव येथील प्रस्तावित कत्तलखान्या विरोधात गावकऱ्यांनी आमरण उपोषणाला केली सुरुवात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील पवनगाव –धारगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत सर्वे क्रमांक 54 /2 मध्ये गावकऱ्यांना विश्वासात न घेता एनएमआरडी महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित कत्तलखाण्याला मंजुरी दिल्याच्या विरोधात पवनगाव येथील गावकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे महाराष्ट्र शासनाचे वतीने पवनगाव ग्रामपंचायत व गावकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता विश्वासात न घेता आठ दिवसांपूर्वी पवनगाव येथे एनएमआरडीच्या वतीने खासरा क्रमांक 54 /2 येथे प्रस्तावित कत्तलखाना उभारण्यासाठी परवानगी दिली असल्याची माहिती होताच पवगाव येथील गावकऱ्यांनी मोर्चा काढून कत्तलखान्याचा विरोधात जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांना निवेदन देऊन कत्तल खाण्याचा विरोध केला होता शासनाच्या वतीने कोणतीही दखल न घेता प्रस्तावित कत्तलखान्याला सुरुवात झाल्यामुळे गावकऱ्यांनी प्रस्तावित कत्तलखान्याविरोधात सरपंच नेहा राऊत, उपसरपंच रामचंद्र रेवाडे, ग्रामपंचायत सदस्य किरण राऊत ,सदाशिव अजवले ,मारुती ठाकरे ,शेषराव शिंगणे ,अविनाश पांडे ,अनिल ठाकरे ,प्रफुल्ल चौधरी ,मनोज खेवले ,नयन केदार ,हर्षल सिंगने ,नंदा शिंगणे, छाया चौधरी , वंदना शिंगणे ,कलावती शिंगणे, सविता काळे ,स्वाती चांदेकर ,माधुरी काळे ,पद्मा चौधरी ,नीता पांडे ,प्रदीप पुरी, पंकज काळे, कल्याणी गेडाम ,रुपेश सहारे ,गंगाधर गेडाम, संजय भैसारे, शंकर ढोरे ,दशरथ रहाटे, शेषराव शिडाम, कैलास कन्नाके, पुरुषोत्तम फलके ,महेश फलके, सह गावकरयांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत प्रस्तावित कत्तलखाना रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिल्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली असून कळमना पोलीस ठाण्यातील पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शाहीर कलाकारांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आमरण उपोषण करणार - शाहीर बावनकुळे

Sun Mar 3 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – संतांची संयुक्त जयंती व भव्य कलाकार मेळा व्यात लोककलावंत व पत्रकारांचा सत्कार कन्हान :- भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया व्दारे छत्रपती शिवाजी महाराज, श्री विश्वकर्मा, संत गाडगे बाबा, संत रविदास व लोकशाहीर वस्ताद स्वर्गीय भिमराव बावनकुळे यांची संयुक्त जयंती उत्सव व भव्य कलाकार मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमा सह भजन मंडळी, शाहीर कलाकार आणि पत्रकारांचा सत्कार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com