अरोली :- तारसा – चाचेर जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या भेंडाळा येथे उद्या दिनांक 7 जानेवारी शुक्रवारपासून सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम समिती तर्फे दोन दिवसीय सांस्कृतिक मंडळ उत्सवाची सुरुवात होणार आहे.
शुक्रवारला सकाळी नऊ वाजता पासून जिल्हा चंद्रपूर तालुका नागभीड मुक्काम काम्पा कलापथक निळा निशान शाहीर सुरमा बारसागडे यांच्या संपूर्ण पार्टी सहित विरुद्ध जिल्हा ,तहसील वर्धा राहणार समुद्रपूर तुरा पार्टी शाहीर विठ्ठल माहुरे यांच्या दुय्यम खडा तमाशा, दिनांक आठ जानेवारी शनिवारला रात्री साडेआठ वाजता न्यू रेकॉर्डिंग डान्स ग्रुप अँड लावणी शो यांच्या बहारदार लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री गडचिरोली आशिष जयस्वाल, कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्यामकुमार बर्वे, प्रमुख अतिथी माजी मंत्री राजेंद्र मूळक, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, प्रहारसंघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे, नंदा लोहबरे, माजी सभापती स्वप्नील श्रावणकर, लक्ष्मण उमाळे, माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर चौरे, निमखेडा माजी सरपंच शिणू यागंटी, मांगली तेली माजी सरपंच रवींद्र फटिंग ,भाजपा तालुका उपाध्यक्ष रवी चव्हाण, भेंडाळा पोलीस पाटील किशोर भोयर, तंटामुक्त अध्यक्ष नामदेव वाघाडे, गट ग्रामपंचायत भेंडाळा सरपंच शिल्पा भोयर ,उपसरपंच सुषमा धांडे, ग्रामपंचायत सदस्यगण वैशाली वाघाडे ,सुनिता नगरारे ,यशोदा भोयर ,भामिता शेंडे, अमोल उईके, आकाश शंभरकर, पोमू मानापुरे ,गौरी शंकर कारेमोरे सह गावातील, परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, पुढारी, मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम समिती सह समस्त भेंडाळावासियांनी केले आहे व कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी ग्रामवासी परिश्रम घेताना दिसत आहेत.