– पश्चिम नागपुरात ‘मविआ’चा प्रचार शिगेला
नागपूर :- महायुती महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहे. ते रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आणणे ही काळाची गरज आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर, महिला आणि मुलींसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात येणार. तेलंगणात काँग्रेसने सत्तेत आल्यानंतर ही यशस्वीपणे लागू केली आहे. आता तेलंगणाच्या धरतीवर नागपुरात महिलांसाठी आणि मुलींसाठी आपली बस (सिटी बस सेवा) मोफत करण्याच्या पर्यायाचा विचार करण्याचा संकल्प पश्चिम नागपुरचे विद्यमान आमदार, नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला.
प्रसिद्धी पत्रकातून महाविकास आघाडीचे पश्चिम नागपूरचे लोकप्रिय उमेदवार ठाकरे यांनी सांगितले की, एसटी बसमध्ये उपलब्ध होत असलेल्या सर्व सवलती नागपुर शहरात धावणाऱ्या ‘आपली-बस’ सेवेमध्ये आधीच दिल्या जात असल्याचे अधोरेखित केले आहे. जनतेने महाविकास आघाडीला संधी दिल्यास, एसटी बस प्रमाणेच ‘आपली-बस’ मध्येही मोफत सेवा लागू करण्यात येईल. नागपूर महानगरपालिकेसाठी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक निधी राज्य सरकारकडून मंजूर करून घेण्याचे प्रयत्न महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर केले जातील, असेही विकास ठाकरे यांनी नमूद केले.
महिला सुरक्षिततेचा प्रश्न काळजीपूर्वक सोडविणार
संपूर्ण देश हा महागाई, बेरोजगारीने होरपळलेला आहे. राज्य सरकारची लाडकी बहीण योजना हा केवळ निवडणुकीपुरता लॉलीपॉप असून, महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महिलांच्या सन्मानार्थ महालक्ष्मी योजनेमार्फत 3 हजार प्रतिमाह देणार व सोबतच महिलांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे करून राज्यातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न काळजीपूर्वक सोडविणार, अशी ग्वाहीही ठाकरे त्यांनी दिली. राज्यात महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी, शेतमजूर नोकरदार, कर्मचारी, महिला वर्ग, विद्यार्थी, बेरोजगार तरुण-तरुणी यांच्यात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. तसेच, राज्यात गगनाला भिडलेली महागाई, महिला अत्याचार, गंभीर गुन्हे, गुंडाराज या सर्व बाबींमुळे हे भ्रष्ट महायुती सरकार सपेशल अपयशी ठरले आहे. आता राज्यातील नागरिकांना परिवर्तन हवे असून, येणारा सत्ताकाळ हा महाविकास आघाडीचाच राहणार असल्याचेही ठाकरे म्हणाले.
जन-आशीर्वाद यात्रेने पश्चिम नागपुरकरांचे वेधले लक्ष
महाविकास आघाडीचे पश्चिम नागपुरचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरेंच्या जन-आशीर्वाद यात्रा शनिवारी सायंकाळच्या सत्रात गड्डीगोदाम चौकातून करण्यात आली. सायंकाळी पाचच्या दरम्यान राजेश अरोरा यांच्या कार्यालयापासून सुरु झालेल्या महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येत प्रचारार्थ उपस्थितीने पश्चिम नागपुरकरांचे लक्ष वेधले होते. यावेळी विकास ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करून जन-आशीर्वाद यात्रेला प्रारंभ झाला. यानंतर पुढे सुदर्शन कॉलनी, कामठी रोड, परदेशी मोहल्ला, गड्डीगोदाम मस्जिद, पोलीस चौकी, प्रजापती चौक, छोटी चौक, सेन्ट जॉन स्कूल, पोस्ट आफिस, टेन्ट लाईन, मोहन नगर, चौरसिया चौक, भिमसेन चौक, गोंड मोहल्ला येथे यात्रेचे समापन झाले. गेल्या पाच वर्षात पश्चिम नागपुरात विकास ठाकरेंनी केलेली कामे आज क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरला आहे. विकास ठाकरेंच्या जन आशिर्वाद यात्रेत या वचननामाचे वाटप नागरिकांना करण्यात आले. यात महाविकास आघाडीच्या पंचसूत्री योजना पश्चिम नागपुरातील जनतेला पोहचविण्यात आल्या. यात प्रामुख्याने महालक्ष्मी योजना महाराष्ट्रात लागू करणार असल्याचा विश्वास भगिनींना देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.