नितीन लिल्हारे,प्रतिनिधी
पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भंडारा जिल्ह्यात धडक मोर्चा
मोहाडी :- भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात समस्या दूर होईना त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न व मागण्यांसाठी विकास फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली विकास फाउंडेशनच्या वतीने आज तुमसर तहसिल कार्यालयावर भूमीपुत्रांचा जनसुनावणी धडक मोर्चा काढण्यात आला.
घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती, शेतीसाठी लोड शेडिंग बंद करून 8 तास वरून 12 तास वीज उपलब्ध करावे, पी एम किसान योजनेचे योग्य लाभार्थ्यांना पैसे वसुलीचे दिलेले नोटीसची कार्यवाही थांबविण्यात यावी, खाजगी, शासकीय- -निमशासकीय कामांना 500 रुपयांत प्रति ब्रास रेती शासनाने उपलब्ध करावी,माती-मुरूम रॉयल्टी माफ करून मंडळ अधिकारी यांना परवानगीचे अधिकार द्यावे, गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजना पुनः सुरू करावी, तलाव, नाला,बोडी, जंगलातील नाला,तलाव खोलीकरण करून शेतीसाठी सदर गाळ विनामूल्य देण्याची अधिसूचना प्रकाशित करावी, तुमसर नगर परिषदेने वाढविलेला स्वच्छता कर माफ करावे,ग्रामीण भागातील घरकुल योजनेला 2.50 लाख रुपये निधी द्यावी, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे या प्रमुख मगाण्यांसाठी तुमसर तहसिल कार्यालयावर धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले.
शेतमजूर आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला काम द्यावे. अशा अनेक समस्या बाबत आज तुमसर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास विकास फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिला.
यावेळी संदीप ताले उपाध्यक्ष जि. प. भंडारा, बालु सेलोकर सभापती जि.प.भंडारा, धुरपता मेहर जि.प. सदस्य, नंदु रहांगडाले सभापती, हिरालाल नागपुरे उपसभापती, पल्लवी कटरे पं.स.सदस्य,सुशिला पटले,उपसभापती, बबलू मलेवार उपसभापती,उमेश पाटिल जि. प.सदस्य, मेहताबसिंग ठाकूर, अनिल जिभकाटे, अजय बडवाईक, गौरव नवरखेले, अनिल हटवार, किशोर माटे, अश्विन ठाकूर, हर्षद ठाकूर, चंदू तुरकर, हरीचंद्र बधाटे, महेश कळंबे, चंदू पिल्लारे माजी जि. प. सदस्य, जगदीश शेंडे प.स.सदस्य, प्रकाश खराबे, किशोर भैरम,मनोहर बुराडे,सरपंच गुरुदेव भोंडे, सरपंच धनराज आगाशे, सरपंच आदी उपस्थित होते.