आडका सेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्षपदी विजय खोडके बिनविरोध विजयी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 
कामठी ता प्र 29 :- कामठी तालुक्यात एकूण 34 सेवा संस्था कार्यरत असून यातील 27 सेवा सहकारी संस्थांचा पंचवार्षिक कार्यकाळ संपल्याने पुढील पंचवार्षिक कार्यकाळासाठी नुकतेच 27 सेवा सहकारी संस्थांच्या संचालक पदाची निवडणूक घेण्यात आली ज्यामध्ये 25 सेवा सहकारी संस्थांची बिनविरोध निवडणूक झाली असून उर्वरित कढोली आणि शिरपूर ची निवडणूक ही बिनविरोध होत नसल्याचे चित्र आहे .तर आज 29 जून ते 5 जुलै पर्यंत होऊ घातलेल्या सेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीनुसार आज आडका,पांढुर्णा, भुगाव व सावळी गारला सेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. ज्यामध्ये आडका सेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्षपदी विजय शंकर खोडके तर उपाध्यक्षपदी नामदेव नारायण राऊत बिनविरोध निवडून आले तसेच सावळी गारला सेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्षपदी युवराज भाऊराव शहाणे,उपाध्यक्षपदी रामभाऊ राजेराम इंगोले , भुगाव सेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्षपदी विनोद पांडुरंग खोडके तर उपाध्यक्षपदी सेवक बालाजी धोटे तसेच पांढुर्णा सेवा सहकारी संस्थाच्या अध्यक्षपदी मुरलीधर वैद्य तसेच उपाध्यक्षपदी कैलाश खेडकर यांची निवड करण्यात आली.या निवडीबद्दल निवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आले.
आज कामठी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आर एम बावणे व एम पी राऊत यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या अध्यक्ष , उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आडका सेवा सहकारी संस्थाच्या अध्यक्षपदी विजय खोडके व उपाध्यक्ष पदी नामदेवराव राऊत (पाटील) निवडून आल्या बद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष विजय खोडके व उपाध्यक्ष नामदेव राऊत यांनी आडका सेवा सहकारी संस्था सदस्य विष्णू नागमोते,पुरुषोत्तम मानमोडे, मारोती देऊळकर, भगवान मारबते, बेबी देऊळकर, संगीता चांभारे व लटारूजी चांभारे, नरहरी खोडके,मंगेश मानमोडे,नथ्युजी ठाकरे, रंगराव देऊळकर, संतोषजी काकडे, मुरलीधरजी चांभारे, व गावकरी मंडळीचे मनपूर्वक आभार मानले .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नूतन सरस्वती विद्यालयात शालेय प्रवेशोत्सव साजरा

Wed Jun 29 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी २९ जून शाळेचा पहिला दिवस साजरा विद्यार्थ्यांचे ‘स्कुल चले हम’ कामठी, ता.२९ :- गेल्या दोन वर्षात कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी नूतन सरस्वती विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शिक्षणोत्सव २०२२ आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा ग्रामीण उद्धार सोसायटीचे अध्यक्ष देवराव रडके, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com