विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ – आचारसंहिता भंगाच्या 2452 तक्रारी निकाली,253 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी 15 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 2469 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 2452 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

253 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण 253 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विशेष वृत्त : राज्यात ९.७ कोटी मतदार;  पुण्यात सर्वाधिक; पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक

Mon Nov 4 , 2024
मुंबई :- विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे. पुण्यात ८८ लाखांहून अधिक मतदार पुण्यातील एकूण मतदारसंख्या ८८ लाख ४९ हजार ५९० आहे तर मुंबई उपनगरात ७६ लाख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!