विधानपरिषद नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूक पाच उमेदवारांचे अर्ज मागे ; ३० जानेवारीला मतदान

नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. एकूण पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार असून एकूण २२ उमेदवार निवडणूक लढणार आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांच्या उपस्थितीत आज दुपारी ३ वाजेपर्यंत नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार निळकंठ उईके, अतुल रुईकर, मुकेश पुडके आणि मृत्यंजय सिंह यांनी तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी २२ उमेदवार निवडणूक लढणार आहेत. निवडणूक लढणारे उमेदवार खालील प्रमाणे.

भारत निवडणूक आयोगाने 29 डिसेंबर 2022 रोजी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमधून एकूण २७ उमेदवारांनी ४३ नामनिर्देशपत्र दाखल केले होते.

३० जानेवारीला मतदान

भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार ३० जानेवारी २०२३ रोजी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. २ फेब्रुवारी २०२३ रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भामरागड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

Mon Jan 16 , 2023
गडचिरोली : दि. 16 जानेवारी 2022 रोजी भामरागड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये कृषी विभागामार्फत करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथील शालेय विभागाच्या प्रमुख समीक्षा आमटे उपस्थित होत्या. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी  आनंद गंजेवार, पप्पुलवार, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com