विधानपरिषद नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणूक , 27 उमेदवारांचे 43 नामनिर्देशनपत्र दाखल: आज नामनिर्देशनपत्राची छाननी

नागपूर :– विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी काल नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा शेवटचा दिवस होता.  एकूण 16 उमेदवारांनी 24 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 27 उमेदवारांनी 43 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी शुक्रवार, 13 जानेवारी रोजी होणार असून १६ जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने 29 डिसेंबर 2022 रोजी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये ‍शिक्षक मतदार संघासाठी ५ जानेवारी पासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आतापर्यंत 27 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

शेवटच्या दिवशी 16 उमेदवारांचे 24 नामनिर्देशनपत्र 

नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्वाधिक 16 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यात अपक्ष उमेदवार नागो गाणार यांनी दोन नामनिर्देशनपत्र दाखल केले. श्रीधर साळवे, सतिश इटकेलवार, उत्तमप्रकाश शहारे, निळकंठ उईके, राजेंद्र बागडे, प्रा. सचिन काळबांडे, प्रविण गिरडकर, संजय रंगारी आणि अतुल रुईकर या अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. अपक्ष उमेदवार मुकेश पुडके यांनी चार नामनिर्देशनपत्र दाखल केले. आमआदमी पक्षाचे उमेदवार देवेंद्र वानखेडे यांनी दोन नामनिर्देशनपत्र तर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार निमा रंगारी यांनी एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पक्षाचे उमेदवार नरेश पिल्ले यांनी चार नामनिर्देशनपत्र दाखल केले. तसेच यापूर्वी नामनिर्देशनपत्र दाखल करणारे अपक्ष उमेदवार मृत्युंजय सिंग आणि अजय भोयर यांनी आज प्रत्येकी एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

तत्पूर्वी, नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी बुधवारी एकूण सात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. यात वर्धा येथील अपक्ष उमेदवार रविंद्रदादा डोंगरदेव आणि बाबाराव उरकुडे यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. नागपूर येथील अपक्ष उमेदवार प्रा. सुषमा भड आणि नरेंद्र पिपरे यांनी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. नागपूर येथील अपक्ष उमेदवार विनोद राऊत आणि वर्धा येथील महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे उमेदवार सतिश जगताप यांनी प्रत्येकी दोन नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.

चंद्रपूर येथील अपक्ष उमेदवार रामराव चव्हाण यांनी पहिल्याच दिवशी (५ जानेवारी) एक नामनिर्देशनपत्र तर ९ जानेवारीला दोन असे एकूण तीन नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. चंद्रपूर येथील अपक्ष उमेदवार सुधाकर अडबोले यांनी ९ जानेवारीला दोन नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. गोंदिया येथील मृत्युंजय सिंह या अपक्ष उमेदवाराने एक नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. नागपूर येथील राजेंद्र झाडे यांनी समाजवादी ( संयुक्त) पक्षाकडून दोन नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. वर्धा येथील अपक्ष उमेदवार अजय भोयर आणि नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दीपराज खोब्रागडे यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.

उद्या १३ जानेवारीला नामनिर्दशनपत्रांची छाननी

विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी सहा जिल्ह्यांतून प्राप्त नामनिर्देशनपत्रांची शुक्रवार, १३ जानेवारी २०२३ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात छाननी होणार आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधून ‍शिक्षक मतदार संघासाठी ५ ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले आहेत. प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी तथा नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या तळमजल्यावर सभा कक्ष क्र. १ मध्ये सकाळी ११ वाजता पासून होणार आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (सामान्य) प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे.

उमेदवारांना १६ जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. ३० जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे तर २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. ४ फेब्रुवारी पर्यंत निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया संपणार आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तिडके विद्यालयात विवेकानंद व जिजाऊ जयंती साजरी 

Fri Jan 13 , 2023
बेला : विमलबाई तिडके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य राजेंद्र तिडके होते . यावेळी ज्येष्ठ शिक्षक महेंद्र महाले मंचावर उपस्थित होते .मान्यवरांनी विवेकानंद व जिजाऊ माता यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानिमित्त मुख्याध्यापक व महाले यांनी विद्यार्थ्यांना विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचे जीवन कार्याची माहिती सांगितली. प्रास्ताविक रविकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com