विदर्भाची भाग्यरेषा कॉफी टेबल बुकचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

भंडारा :- जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्या वतीने प्रकाशित विदर्भाची भाग्यरेषा या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साकोली येथील खासदार सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमात करण्यात आले.

या कार्यक्रमाला खासदार सुनिल मेंढे,माजी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले यांच्यासहित अन्य मान्यवर व जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते. गोसे खुर्द प्रकल्पाची इत्यंभूत माहिती देणाऱ्या या पुस्तिकेमध्ये गोसे खुर्द प्रकल्पाच्या स्थापनेपासून तर आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आलेला आहे .राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाची माहिती सविस्तर या कॉफी टेबल बुकमध्ये देण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चार विद्यार्थ्यांची कर्मण्य कोचिंग इन्सिट्युट बुटीबोरी यांनी केली फसवणूक

Sun Oct 8 , 2023
नागपूर :- साधना गेडाम मु.नागपूर यांनी पत्रपरिषदेमध्ये पत्रकारांना सांगितले की कर्मण्य कोचिंग इन्स्टिट्यूट बुटीबोरी एमआयडीसी रोड नागपूर यांनी चार विद्यार्थ्यांची फसवणूक केली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आणून फीस परत न देण्याचा त्यांच्या भूमिकेमुळे पत्रकारांना साधना गेडाम व मनोहर कोरपे यांनी सांगितले. पत्रकारांना कर्मण्य कोचिंग इन्शुटियुट बद्दल ही माहिती दिली. त्या माहितीमध्ये चार विद्यार्थ्यांचे भविष्य खराब झाल्याचे दिसून आल्याने त्यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com