नागपूर :- राज्यपाल रमेश बैस हे आज (गुरुवार,दि.7) ते 13 डिसेंबरपर्यंत विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार (दि.8) रोजी सकाळी 9.40 वाजता राजभवन येथून भंडाराकडे प्रयाण करतील. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील संरक्षण सेवा अकादमी, शहापूर येथे होणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास उपस्थित राहुन दुपारी 12.30 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील. त्यानंतर राजभवन येथे मुक्कामी राहतील.
राज्यपाल रमेश बैस हे शनिवार (दि.9) रोजी सकाळी 11.30 वाजता मोटारीने अमरावतीकडे प्रयाण करतील. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या राजमाता अहिल्याबाई स्त्री शक्ती पूरस्कार कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता अमरावती येथून वर्धाकडे प्रयाण करतील. वर्धा येथील विकास भवन, गांधी चौक येथे सायंकाळी 5 वाजता रोटरी क्लबच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता विकास भवन येथून नागपूरकडे प्रयाण करतील. त्यानंतर राजभवन येथे मुक्कामी राहतील.
रविवार (दि.10) रोजी सकाळी 10.10 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथून हेलिकॉप्टरने पोरला, गडचिरोलीकडे प्रयाण करतील. त्यानंतर 11 वाजता शिवाजी कनिष्ठ कला महाविद्यालय येथे होणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेला प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील. पोरला हेलिपॅड येथून दुपारी 1.40 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील. त्यानंतर दुपारी 2.20 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व राजभवन येथे मुक्कामी असतील.
मंगळवार (दि.12) रोजी सायंकाळी 5.30 वाजता राजभवन येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे सायंकाळी 6 वाजता ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाच्या टिचिंग एक्सपर्ट पुरस्काराचे वितरण होईल.
बुधवार (दि.13) रोजी सकाळी 10.20 वाजता राजभवन येथून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडे प्रयाण करतील. सकाळी 10.30 वाजता तेथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतील. त्यानंतर सकाळी 11.40 वाजता राजभवन येथे आगमन होईल. राज्यपाल रमेश बैस हे दुपारी 1.10 वाजता नागपूर येथून मुंबईकडे विमानाने प्रयाण करतील.