विदर्भाला संत्रा प्रक्रिया उद्योगांची आवश्यकता – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– वनस्पती आरोग्य व्यवस्थापनावर राष्ट्रीय परिषद

नागपूर :- संत्रा ही नागपूरची ओळख आहे. संपूर्ण देशात ‘ऑरेंज सिटी’ अशी नागपूरची ओळख आहे. त्यामुळे येथील ऑरेंज बर्फी देशात जावी, यासाठी मी खूप आग्रही आहे. नागपुरात होत असलेल्या मदर डेअरीच्या मेगा मॅन्युफॅक्चरिंग प्लान्टच्या माध्यमातून हा उद्देश पूर्ण होईल. अशाप्रकारच्या व्हॅल्यू एडिशन्स खूप महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी संत्रा प्रक्रिया उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे. विदर्भातील संत्रा उत्पादकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केले.

रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये वनस्पती आरोग्य व्यवस्थापनावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी आणि केंद्रीय लिंबुवर्गीय संशोधन संस्थान (सीआयसीआर) यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी ना.  गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर आयसीएआरचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक, एसआरबीचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना.गडकरी म्हणाले, ‘ऑरेंज सिटीच्या नात्याने नागपुरात ही परिषद जास्त महत्त्वाची आहे. विदर्भातील कृक्षी क्षेत्र अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्नही भेडसावत आहे. अशात परिस्थिती बदलण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यासाठी आम्ही विविध प्रकल्पांवर काम करतोय. कृषी क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करतोय.’

ते म्हणाले, ‘कापूस, संत्रा ही विदर्भाची मुख्य पिके आहेत. प्रत्येक क्षेत्रात, विशेषतः उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञान, बाजारपेठ महत्त्वाचे असते. स्पेनमध्ये ऑरेंज ऑर्कीड आहे. याठिकाणी एका एकराला ३० टन संत्र्याचे उत्पादन आहे. तर आपल्याकडे एकरी १२ ते १५ टन उत्पादन आहे. त्यात गुणवत्ता सुधारण्याचीही गरज आहे. त्यादृष्टीने आयसीएआर चांगले काम करत आहे. ऑरेंज ऑर्किड विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’

आयसीएआरने वेगवेगळ्या संस्थांच्या नर्सरी सोबत घेण्याची गरज आहे. त्यासाठी प्लान्ट पॅथॉलॉजी स्थापन होण्याची गरज आहे. रोगविरहित कलमांची, झाडांची आवश्यकता आहे. प्रतिबंधात्मक उपाय करण्याची गरज आहे, याचाही ना. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अमेय गुप्ता, तृप्ती वाडकर सायकलिंगमध्ये अव्वल - खासदार क्रीडा महोत्सव 

Mon Jan 20 , 2025
– विदर्भस्तरीय सायकलिंग स्पर्धा नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील सायकलिंग स्पर्धेमध्ये अमेय गुप्ता आणि तृप्ती वाडकर मुले आणि मुलींमध्ये अव्वल ठरले. रविवारी (ता.१९) दीक्षाभूमी जवळील साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे चौकातून सायकलिंग स्पर्धेला सुरूवात झाली. १९ वर्षाखालील मुलांच्या २१ अंतराच्या सायकलिंग स्पर्धेमध्ये जैन इंटरनॅशनल स्कूलच्या अमेय गुप्ता (३२.३०.१२) ने प्रथम स्थान प्राप्त करीत सुवर्ण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!