आप’ चे फायर ब्रँड खासदार संजय सिंग यांची उपस्थिती
नागपूर :- दिल्ली आणि पंजाब मध्ये आप सरकार करत असलेल्या जनकल्याण कामाची देशात जोरदार चर्चा होत आहे. पार्टी आणि पार्टी चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता देशभर जोमात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर विदर्भात आम आदमी पार्टी कामाला लागली असून जनतेचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सातत्याने लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवणे, जनतेच्या संपर्कात राहणे, काम करून देणे यामुळे पार्टीला महाराष्ट्रसह विदर्भात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका लढणे आणि जिंकून राष्ट्र निर्माण करण्यासाठी उद्या सभा होत आहे. दिल्ली आणि पंजाब राज्यात कसे कार्य चालू आहे याचे महत्व पटवून देण्यासाठी उद्याची सभा महत्वाची आहे. या संपुर्ण संदर्भाने कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून राष्ट्र निर्माण संकल्प निर्धार करण्यासाठी फायर ब्रँड राज्यसभा खासदार संजय सिंग यांची 17 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 1 वाजता सुरेश भट सभागृह नागपुर येथे भव्य विदर्भ स्तरीय राष्ट्र निर्माण संकल्प सभा व मार्गदर्शन होणार आहे. यावेळी महाराष्ट्र संजोजक रंगा राचुरे, माझी खासदार हरिभाऊ राठोर सहसंयोजक राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित राहतील. सोबतच संपूर्ण विदर्भ समिती, सर्व जिल्हा संयोजक व पदाधिकारी उपस्थित राहून आगामी निवडणुकी बद्दल रणनीती सांगतील या संकल्प सभेला विदर्भातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहतील. अशी माहिती आज विदर्भ संयोजक डॉ. देवेंद्र वानखडे यांनी दिली.