उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा महाराष्ट्र दौरा

– केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकपूर्ती सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

नवी दिल्ली :- उपराष्ट्रपती जगदीप धनखड ३ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार असून, मुंबई येथे विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

यावेळी उपराष्ट्रपती भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (CIRCOT) शतकपूर्ती स्थापना दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यासोबतच, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शताब्दी स्तंभाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था ही कापूस उत्पादन आणि तंत्रज्ञानातील संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान देणारी संस्था आहे. संस्थेच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये कृषी तज्ज्ञ, संशोधक, तसेच इतर मान्यवर उपस्थित राहतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुंदर माझे उद्यान व सुदंर माझी ओपन स्पेस स्पर्धेत बियाणी नगर उद्यान व वाघोबा बहुद्देशीय सामाजिक संस्था ठरले विजेते 

Mon Dec 2 , 2024
– 1 लक्ष रुपयांचे रोख बक्षीस व परिसरातील विकास व सौंदर्यीकरणास मिळणार प्रत्येकी 11 लक्ष    चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिके तर्फे15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आलेल्या ” सुंदर माझे उद्यान ” व ” सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले असुन तुकूम येथील बियाणी नगर उद्यानास 1 लक्ष व सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धेत बाबुपेठ येथील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com