उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज नागपुरात

– रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरचे त्यांच्या हस्ते लोकार्पण

– राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचीही राहणार उपस्थिती

नागपूर :- उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन दिनांक १५ सप्टेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत.

रामदेबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरचे लोकार्पण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास मा. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती राहणार आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे १५ सप्टेंबर रोजी दुपारी २.३५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन होईल. दुपारी २.४० वाजता त्यांचे कार्यक्रमस्थळी विमानळावरून प्रस्थान होईल. दुपारी २.५५ वाजता रामदेवबाबा विद्यापीठ येथे आगमन, दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान रामदेवबाबा विद्यापीठाच्या डिजिटल टॉवर लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ४ वाजता उपराष्ट्रपती महोदयांसमवेत  राज्यपाल यांचे विमानतळाकडे प्रस्थान. दुपारी ४.२५ वाजता उपराष्ट्रपती महोदयांच्या प्रस्थानप्रसंगी मा. राज्यपाल यांची उपस्थिती. उपराष्ट्रपती यांचे नागपूर येथून प्रयाण झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता मा. राज्यपाल यांचे राजभवन, नागपूर येथे आगमन व मुक्काम.

१६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.४० वाजता राजभवन येथून नागपूर रेल्वेस्थानकाकडे प्रस्थान. दुपारी 3.55 वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आगमन. दुपारी ४ वाजता नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस, पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस, कोल्हापूर-पुणे एक्सप्रेसला हिरवा झेंडा ते दाखवतील. सायंकाळी ५.१५ वाजता राजभवन येथे आगमन. रात्री ९.०० वाजता राजभवन येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळाकडे प्रस्थान. रात्री ९.५० वाजता विमानाने राज्यपाल महोदयांचे मुंबईकडे प्रयाण होईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

Sun Sep 15 , 2024
नागपूर :- राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि. 16 सप्टेंबर, 2024 रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. नागपूर जिल्हयातील मुस्लीम धर्मीयांकडून काढण्यात येणा-या मिरवणुकीसबंधी मुस्लीम बांधवांसोबत सल्लामसलत करुन शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने सोमवार, दि. 16 सप्टेंबर करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!