अमरावती :- महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीशकुमार शुक्ल यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला आज भेट दिली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर व राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू यांनी विद्यापीठाच्यावतीने त्यांचे पुस्तक व दैनंदिनी देवून स्वागत केले. विद्यापीठाचा निसर्गरम्य परिसर पाहून ते मोहित झाले. यावेळी विद्यापीठ विकासावर चर्चा करण्यात आली. प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर यांनी विद्यापीठ विकासात्मक माहिती यावेळी दिली. यावेळी हिंदी विद्यापीठातील प्रोटोकॉल अधिकारी राजेश यादव, शिक्षण विभागातील डॉ. योगेन्द्र बाबू, डॉ. शिल्पी कुमारी, सहा. प्रा. डॉ. अनिकेत आंबेकर, डी.सी.पी.ई. चे डॉ. उदय मांजरे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरूंची अमरावती विद्यापीठाला भेट, प्र-कुलगुरूंच्याहस्ते सत्कार
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com