वेलतूर :- मौजा डोंगरमौदा, ता. कुही येथे फिर्यादी नामे अल्का संजय रघुते, वय ३६ वर्ष, रा. डोंगरमौदा, ता. कुही जि. नागपूर ही आपल्या पतीसह ११/०० वा. च्या सुमारास मकरधोकडा येथे बहीनीकडे गेली असताना कोणीतरी अज्ञात ईसमाने फिर्यादीचे घराचे दरवाज्याची कड़ी उघडुन आत प्रवेश करुन कपाटाचे लॉकर तोडुन कपाटातील दागिन्याचा डबा उघडुन डब्यातील जुने वडीलोपार्जीत १) १ काळी गरसुली, डोरला अंदाजे ५ ग्रॅमचा सोना किंमती ७,५००/- रु २) २ जोड सोन्याचे ४ ग्रॅम किंमती ६०००/- रु ३) १० ग्रॅम गोप व लॉकेट किंमती १५,०००/-रु ४) ५ ग्रॅम सोन्याचे चैन व लॉकेट किंमती ७,५००/-रु ५) ५ ग्रॅम सोन्याचे अंगठी किंमती ७,५००/-रु ६) २ ग्रॅम सोन्याचे नथ किंमती ३०००/-रु ७) ९ ग्रॅमचे गरसुली मध्ये सोन्याचे मणी किंमती १३,५००/-रु व चांदीचे जोडवे किंमती १०००/-रु असा एकुण सोन्याचांदीचे ६१,०००/- रु चा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. अशा फिर्यादीच्या रीपोर्ट वरून पोस्टे वेलतूर येथे अप क्र. १४३/२४ कलम ३०५(अ), ३३१ (४) भा.न्या.स. अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदर गुन्हयात अज्ञात आरोपीचा शोध तपास पथक घेत असता मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तसेच फिर्यादीचे मुलाने सांगितलेल्या आरोपीचे वर्णनावरून सदर गुन्हयातील आरोपी हे डोंगरमौदा गावातीलच असल्याची खात्री वळावल्याने आरोपीचा अहोरात्र शोध घेवुन आरोपी नामे १) मुकेश सुर्यभान मेश्राम वय ३३ वर्ष, २) निलेश मधुकर रघुते वय ३२ वर्ष दोन्ही रा. डोंगरमौदा ता. कुही जि. नागपुर यांना डोगरमौदा येथुन ताब्यात घेतले. सदर गुन्हयाबाबत आरोपीतांना सखोल विचारपुस केली असता दोघांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरी केलेला मुद्देमाल हा आरोपीतांनी शेत शिवारात तांदळाच्या डिगारामध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. दोन्ही आरोपीस ताख्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्हयातील १) १ काळी गरसुली, डोरला अंदाजे ५ ग्रॅमचा सोना किंमती ७,५००/-रु २) २ जोड सोन्याचे ४ ग्रॅम किंमती ६०००/- रु ३) १० ग्रॅम गोप व लॉकेट किंमती १५,०००/- रु ४) ५ ग्रॅम सोन्याचे चैन व लॉकेट किंमती ७,५००/रु ५) ५ ग्रॅम सोन्याचे अंगठी किंमती ७,५००/-रु ६) २ ग्रॅम सोन्याचे नथ किंमती ३०००/-रु ७) ९ ग्रॅमचे गरखुली मध्ये सोन्याचे मणी किंमती १३,५००/- रु व चांदीचे जोडवे किंमती १०००/- रु असा एकुण सोन्याचांदीचे ६१,०००/- रु मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोहार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे वेलतूर येथील ठाणेदार सपोनि प्रशांत मिसाळे, पोहवा रविंद्र फरकाडे, नापोशि मनिराम भुरे, सफाँ चालक सेलोकर, पोअं. राम राठोड, दिगंबर राठोड, सदाम शेख यांनी पार पाडली.