नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे मानकापुर हद्दीत पेट्रोलींग करीत असत्ता, जिल्हा रूग्नालय गेट जवळ एक मोटर सायकल चालक याचेवर संशय वाटल्याने त्यास ताब्यात घेवून, त्याचे जवळील होन्डा सीबी शाईन वाहन क. एमपी २२ एमएन ७३२२ चे कागदपत्राची मागणी करून त्यास नांव पत्ता विचारले असता, विधीसंघर्षग्रस्त बालक हा उडवाउडवी ची उत्तरे देत असल्याने त्याची सखोल विचारपुस केली असता, त्याने त्याचे ताब्यातील वाहन हे पोलीस ठाणे कन्हान, नागपुर ग्रामीन हद्दीतुन चोरी केल्याचे सांगीतले. अभिलेख तपासला असता, पोलीस ठाणे कन्हान येथे वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले. विधीसंघर्षग्रस्त बालकाचे ताब्यातुन गुन्हयात चोरी केलेली होन्डा शाईन गाडी क. एमपी २२ एमएच ७३२२ किंमती ४५,०००/- रू. जप्त करण्यात आली. विधी संघर्षग्रस्त बालकास पुढील कारवाई करीता मुद्देमालासह कन्हान पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, अर्थात चांडक, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि, राहुल शिरे, पोउपनि, राहुल रोटे, व त्याचे पथकाने केली,