भाजी विक्रेत्या तरुणाचा अकस्मात मृत्यु

संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 3:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा रहिवासी एका 30 वर्षीय भाजी विक्रेत्या तरुणाचा झोपेतच अकस्मात मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 6 दरम्यान उघडकीस आली असून मृतक तरुणाचे नाव शुभम राखडे असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.याचे वडील काही वर्षांपूर्वीच मरण पावल्याने आई व सदर मृतक मुलगा भाजी पाल्याचा विक्री व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. सदर मृतक तरुणाची आई ही खाजगी कामानिमित्त बाहेरगावी नातेवाईकाकडे गेली होती तर घरात हा एकटाच होता.सकाळी बराच उशीर होऊनही बाजार समिती प्रांगणात भाजी विक्री करायला आला नसून मित्रांनी फोन केल्यास प्रतिउत्तर दिल्याने मित्रांनी सदर घटनास्थळ गाठून घरात प्रवेश केला असता सदर तरुण हा अंथरुणावर मृतावस्थेत आढळल्याने एकच धक्का बसला.घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेवुन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.मृत्यूचे कारण अजूनही कळू शकले नसून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे तर मृतक तरुनाला झोपेतच हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पवित्र रमजान महिना आणि शुभ नवरात्रीमध्ये लोडशेडिंग होणार नाही:-मंत्री डॉ नितीन राऊत

Sun Apr 3 , 2022
संदीप कांबळे, कामठी -काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली ऊर्जामंत्र्यांची भेट कामठी ता प्र 3:- महावितरण कंपनीच्या ऊर्जा विभागाच्या वतीने १ एप्रिलपासून शहरातील सर्वसामान्य नागरिकांना या कडाक्याच्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागू शकतो तर सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे महासचिव व कामठी नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष शकूर नागानी, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस . […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com