नवी दिल्ली :- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सर्वाधिक काळ धुरा सांभाळणारे वसंतराव नाईक यांची जयंती उभय महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.
कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार, स्मिता शेलार व उपस्थित कर्मचाऱ्यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
परिचय केंद्रात वसंतराव नाईक यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.