प्रभाग २६ मध्ये विविध चौक व रस्त्यांचे नामकरण आणि भूमिपूजन रविवारी

-५ करोड रुपयांच्या अद्यावत फायर स्टेशनचे देखील भूमीपूजन 
नागपूर, ता. ८ : नेहरूनगर झोनमधील अंतर्गत प्रभाग २६ मध्ये स्थानिक नगरसेवक तथा भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या विशेष प्रयत्नातून चौक व रस्त्यांचे नामकरण आणि विविध कार्याचे भूमिपूजन समारंभ रविवारी ९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी ८.३० वाजता वाठोडा सालासर विहार, आमला ट्री रोड येथे फायर ब्रिगेड स्टेशनचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. सदर भागात ५ कोटी रुपये  किंमतीचे फायर ब्रिगेडचे अद्यावत स्टेशन उभारले जाणार आहे.
सकाळी ९.३० वाजता जयभीम चौक, रमाई आंबेडकर मार्ग येथे पडोळे नगर येथील नाग नदीच्या सुरक्षा भिंतीचे भूमिपूजन आणि जयभीम चौक व रमाई आंबेडकर मार्ग असे नामकरण करण्यात येईल.
सकाळी ८.३० वाजता रिंग रोडवरील वर्मा लोहावाल शैलेश नगर येथे ८१ लक्ष रुपये किंमतीचे डी.पी. रोडचे भूमिपूजन, सकाळी ८.४५ वाजता शांती लेआऊट वाठोडा येथे शांती लेआऊट व घरसंसार सोसायटी येथील २५ लक्ष रुपये प्रस्तावित किंमतीच्या रोडच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन, सकाळी ९ वाजता श्रीराम चौक घरसंसार सोसायटी येथे श्रीराम चौकाचे नामकरण, सकाळी ९.१५ वाजता कामाक्षी नगर, उमिया कॉलनी वाठोडा येथे उमिया कॉलनी येथील उद्यानाचे स्व. रामानुज सिंह नामकरण आणि कामाक्षी नगर येथील रोडच्या डांबरीकरणाचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
नागपूर शहराचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते कामांचे भूमिपूजन आणि नामकरणाचे लोकार्पण होईल. विविध ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे राहतील.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अग्निशमन विशेष समिती सभापती दीपक चौधरी, परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी उपमहापौर व नगरसेविका मनीषा कोठे, दुर्बल घटक समिती सभापती कांता रारोकर, नगरसेविका समिता चकोले, माजी नगरसेवक यशवंत मेश्राम, महेंद्र राऊत, प्रमोद पेंडके, त्रिभूषण रमाई आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष राजकुमार वंजारी, भाजपा पूर्व नागपूरचे अध्यक्ष संजय अवचट, तथागत बुद्ध विहार प्रचार समितीचे अध्यक्ष दिलीप रामटेके, सचिव सत्यवान मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते विनोद मंडपे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, प्रभारी कार्यकारी अभियंता नरेश सिंगनजुडे आदी उपस्थित राहतील.
कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक तथा भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

मनपातर्फे दहाही झोनमध्ये निघाली स्वच्छता जनजागृती रॅली

Sat Jan 8 , 2022
-कचरा विलगीकरणाबाबत केली जनजागृती; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  नागपूर ता. ८ : नागपूर महानगरपालिकेतर्फे शनिवारी (ता. ८) दहाही झोनमध्ये स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत मनपाचे कर्मचारी तसेच स्वयंसेवी सामाजिक संस्थांनी भाग घेऊन नागरिकांना कचरा विलगीकरण करणे, सुका आणि ओला कचरा वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये गोळा करणे तसेच प्लास्टिकचा वापर बंद करण्याबात जनजागृती केली. नागरिकांनी सुद्धा या रॅलीला भरघोस प्रतिसाद दिला. यादरम्यान रॅली काढण्यात आलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com