स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी पर्यटन विभागामार्फत विविध कार्यक्रम – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई :- राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने वीर सावरकर पर्यटन सर्किट आणि वीरभूमी परिक्रमा, असे विविध उपक्रम राबवून अनोखी मानवंदना देण्यात येत असल्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘दिलखुलास’कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावांतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने स्वातंत्र्य संग्रामात भाग घेवून मोलाचे योगदान देणारे थोर, क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ विविध उपक्रम राबविले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान युवा पिढीला स्मरणात रहावे यासाठी शासन स्तरावर पर्यटन विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगानेच वीर सावरकर पर्यटन सर्किट मध्ये विविध स्थळांचा समावेश आहे. भगूरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर वाड्याचे स्थानमहात्म्य, वीरभूमी परिक्रमा हा उपक्रम आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामस्तरीय स्त्री सन्मान पुरस्कार याबाबत पर्यटनमंत्री श्री. लोढा यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, शुक्रवार दि. 26 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक रिताली तपासे यांनी घेतली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Fri May 26 , 2023
रत्नागिरी :-  रत्नागिरी येथील शासकीय उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कौशल्य विकास वास्तूच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. मुख्यमंत्री शिंदे यांनीही कोणतेही सुरक्षा कारण न सांगता विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी काढले. त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. हाच प्रकार लोकमान्य टिळक स्मारक विभागीय शासकीय ग्रंथालयातही दिसून आला. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थिनींच्या आग्रहाखातर सेल्फी घेतले. विद्यार्थ्यांशी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com