जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

भंडारा :- 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या एड्स दिनाचे घोषवाक्य Equalize (आपली एकता, आपली समानता, एचआयव्हीसह जगणाऱ्याकरिता) आहे. 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा सामान्य रुग्णायल येथे रॅली, कलापथक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. रॅलीची सुरुवात सामान्य रुग्णालय-मोठा बाजार-पोस्ट ऑफिस चौक-बसस्टॉप ते जिल्हा रुग्णालय येथे सांगता होणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींकरिता पोस्टर्स-रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने एचआयव्ही बाबत युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने 1 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुका स्तरावरील आयसीटीसी समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचेव्दारे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींकरिता एड्स, क्षयरोग, एसटीआय/आरटीआय, ए.आर. टी. औषधोपचार या विषयावर मार्गदर्शन तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

IPS & much more….Part 1

Thu Dec 1 , 2022
Nagpur :- Well, this blog will answer many of your questions in regard to the IPS postings that happened, are happening in this fortnight and that might happen in the future in Maharashtra. Many of us are inquisitive as to who exactly holds the charge of this department? Is it really DCM & HM Devendra Fadnavis who has absolute control […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!