ग्रामायण प्रदर्शनात ज्येष्ठांच्या विविध स्पर्धा उत्साहात

नागपूर :- ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ग्रामायण सेवा प्रदर्शनात ज्येष्ठ नागरिकांसाठी सोमवारी, प्रश्नमंजुषा, जलद चालणे, स्वयंस्फूर्त भाषण अशा तीन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या विजेत्यांना ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे व अनुराधा सांबरे, सचिव संजय सराफ व सुरेखा सराफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जलद चालण्याची स्पर्धेत महिला गटात वर्षा डांगे प्रथम, शुभदा पंत द्वितीय आणि शुभांगी देशपांडे तृतीय क्रमांकावर राहिल्या. पुरुष गटात नोंदणी कमी झाल्याने स्पर्धा रद्द करण्यात आली.

समय स्फुर्त भाषण स्पर्धेत डाॅ. मृणालिनी फडनाईक प्रथम, रश्मी देवगडे द्वितीय आणि मोहन पांडे तृतीय क्रमांकावर राहिले. या स्पर्धेचे परिक्षक डाॅ तुषार झाडे आणि डाॅ माधुरी वाघ होते. प्रश्नमंजुषा स्पर्धेत रश्मी देवगडे प्रथम, विजय बोरीकर द्वितीय आणि कुंतल निमखेडकर तृतीय क्रमांकावर राहिले.

स्पर्धा प्रमुख म्हणून प्रश्नमंजुषासाठी प्राध्यापक सुरेश खेडकर, जलद चालणे स्पर्धेसाठी विश्वास पंत, तर स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धेत वर्षा देशपांडे यांनी जबाबदारी सांभाळली.

या स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यांनी आपल्या कौशल्य आणि बुद्धिमत्ता या स्पर्धेत दाखवली. या स्पर्धांचे उद्दिष्ट ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय आणि उत्साही ठेवणे हा होता. या स्पर्धांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये एकमेकांशी संवाद साधण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पत्रकारदिनी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राज्यभर महत्त्वपूर्ण उपक्रम

Wed Dec 27 , 2023
– प्रमुख कोअर टीमच्या उपस्थित राज्यातील कामाचा आढावा – नवीन वर्षी पत्रकारांचे घर, सामाजिक उपक्रम कार्यक्रमांचे आयोजन – नवीन वर्षात नवीन पदाधिकाऱ्यांची होणार निवड   मुंबई :- ६ जानेवारी या पत्रकार दिनाच्या निमित्ताने राज्यभरात आरोग्य शिबिर, पत्रकार पाल्यांचा सन्मान, जुन्या पत्रकारांचा सन्मान, पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक कीटचे वाटप, आरोग्य कार्डचे वाटप आदी भरगच्च उपक्रमांचे आयोजन राज्यभर सर्व विभाग, जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com