– नागपूर क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल शुभा मधाळे यांची माहिती
नागपूर :- दरवर्षी डाक विभाग राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करतो, ज्याची सुरुवात 9 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिनापासून होते. या राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या निमित्ताने नागपूर डाक विभागातर्फे सुद्धा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती नागपूर क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल शुभा मधाळे यांनी आज प्रधान डाकघर – जीपीओमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. याप्रसंगी नागपूर शहराच्या टपाल अधीक्षक रेखा रिजवी, पत्र सूचना कार्यालय नागपूरचे उपसंचालक शशिन राय प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर डाकसेवा क्षेत्रात विदर्भातील 11 महसूल जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यात 8 टपाल विभाग, 1 रेल्वे मेल सेवा आणि पोस्टल स्टोअर डेपो आणि मेल मोटर सेवेची दोन कार्यालय इत्यादींचा समावेश आहे. या सर्व विभागांमध्ये आजपासून टपाल सप्ताहाला सुरुवात झाली असून या सप्ताह अंतर्गत 10 ऑक्टोबर रोजी ‘वित्तीय सशक्तिकरण दिवस’ साजरा केला जाईल. याप्रसंगी डाक समुदाय विकास कार्यक्रम ( डाकचौपाल ) विभागांद्वारे केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारमधील सर्व भागधारकांच्या सक्रिय सहभागाने मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातील पोस्ट ऑफिस बचत बँक खाती / इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाती उघडण्यासाठी आणि पोस्टल लाइफ इन्शुरन्स / ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसींच्या खरेदीसाठी मोहिमा आयोजित केल्या जातील.11 ऑक्टोबर रोजी ‘फिलाटली डे चे आयो’जन करण्यात आले असून या अंतर्गतशालेय मुलांसाठी एक छंद म्हणून फिलाटलीबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी फिलाटेलिक क्विझ स्पर्धा, फिलाटेलिक सेमिनार आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातील.12 ऑक्टोबर रोजी ‘मेल आणि पार्सल’ दिवसाप्रसंगी ग्राहकांना पार्सल अंतर्गत इंडिया पोस्टने सुरु केलेल्या नवीन उपक्रमांची माहिती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक मेळाव्याचे आयोजन विभागीय स्तरावर केले जाईल.13 ऑक्टोबर रोजी ‘अंत्योदय दिवस’, साजरा केला जाणार आहे. याअंतर्गत ग्रामीण/दुर्गम भागात आणि शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण शिबिरे आयोजित केली जातील. लोकांना ‘थेट लाभ हस्तांतरण’, सामाजिक सुरक्षा पेन्शन, जन सुरक्षा योजना, सुकन्या समृद्धी खाती यांच्या उपलब्धतेबद्दल जागरूक केले जाईल.
दरम्यान, नागपूर क्षेत्र डाक विभागातर्फे घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती शोभा मधाळे यांनी यावेळी दिली .त्यांनी सांगितलं की व्यापार टपालाचे प्रमाण हे पारंपारिक टपालापेक्षा जास्त वाढले असून स्पीड पोस्ट ही सेवा इतर खाजगी सेवांच्या तुलनेत अतिविश्वसनीय ठरली आहे . इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे 18 लाख 90 हजार खाते संपूर्ण विदर्भात उघडले असून प्रामुख्याने ग्रामीण भागात जिथे बँकिंग व्यवस्था पोहोचली नाही तिथे हे खाते पोहोचले आहेत असे देखील या पत्र परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
नागपूर डाकसेवा क्षेत्राची कामगिरी :
1. ऑगस्ट 2023 मध्ये आझादी का अमृत महोत्सव 2.0 साजरा करताना हर घर तिरंगा मोहिमेदरम्यान नागपुर क्षेत्रांतर्गत एकूण 4, 18,745 राष्ट्रीय ध्वजांची विक्री करण्यात आली आणि 1.04 कोटींचा महसूल प्राप्त केला आहे.
2. नागपुर क्षेत्राद्वारे 3,755 पोस्ट ऑफिसमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटर्सची स्थापना करण्यात आली आहे. 01.04.2023 ते 30.09.2023 पर्यंत सीएससीद्वारे इलेक्ट्रिक बिल, एनपीएस, मोबाइल/डीटीएच रिचार्ज, एलआयसी प्रीमियम, पॅन कार्ड इत्यादींच्या एकूण 12536 व्यवहार मधून रु. 82.78 कोटी चा महसूल प्राप्त केला आहे.
3. ग्रामीण टपाल जीवन बिमा ग्राम अंतर्गत 30.09.2023 रोजी नागपूर विभागातील 312 गावे संपूर्ण बिमा ग्राम म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
4. नागपुर क्षेत्रातील 9 पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्रे (POPSKs) कार्यरत आहेत.
5. नागपुर क्षेत्रातील ग्राहकांना विशेषतः ग्रामीण भागात 248 आधार अपडेट आणि नावनोंदणी केंद्रे निरंतर आधार सेवा पुरवतात.
6. नागपूर क्षेत्राने पोस्टल ऑपरेशन्स अंतर्गत चालू वर्ष 2023-24 मध्ये 31.08.2023 पर्यंत रु.18.69 कोटीचा महसूल प्राप्त केला आहे.
7. चालू वर्ष 2023-24 मध्ये बचत बँक, रोख प्रमाणपत्रे यांच्या संदर्भात रु.102.15 कोटीचा व्यवसाय केला आहे.
8. एकूण 57,841 महिला सन्मान बचत प्रमाणपत्रे 30.9.2023 पर्यंत उघडली गेली आहेत ज्याची रक्कम रु. ४२५.८१ कोटी आहे.
9.पोस्टल लाइफ इन्शुरन्स आणि ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्सच्या संदर्भात 2023-24 दरम्यान 31.08.2023 पर्यंत नागपूर क्षेत्राने अनुक्रमे रु. 75.60 कोटी आणि रु. 26.17 कोटी रुपयांचा विमा व्यवसाय केलेला आहे.
10. जागतिक टपाल दिनानिमित्त पोस्ट विभागाने भारतातील नागरिकांसाठी “क्लिक आणि बुक” नावाची आकर्षक सेवा जाहीर केली आहे. नागपूर विभागाद्वारे नागपूर शहरी भागातील 29 पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा प्रदान करण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्ती ऑनलाइन पोर्टलद्वारे या सेवेचा लाभ घेऊ शकतात. अधिक तपशीलांसाठी कृपया जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.
11. सामान्य विमा मोहिम “सुरक्षा का वादा मध्ये नागपूर क्षेत्राने अखिल भारतीय स्तरावर रु. 1.84 कोटी प्रीमियम लक्ष्या विरुद्ध रु.2.46 कोटी प्रीमियम आणि 61545 पॉलिसीसह 7 वा क्रमांक प्राप्त केला आहे.
12. नागपूर क्षेत्राने 15.11.22 ते 31.3.23 या कालावधीत प्रीमियम थालायवा लीग (प्रीमियम खाते) मोहिमेत महाराष्ट्र सर्कलमध्ये पहिले आणि अखिल भारतीय स्तरावर 6 वे स्थान मिळवले.