संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव याची झालेली निर्घृण हत्या,हादगाव तह.अंतर्गत मातंग समाजाच्या वस्तीवर करण्यात आलेला जीवघेणा हल्ला,आणि मरिन ड्रॅईव्ह मुंबई येथील सावित्रीबाई फुले वस्तीगृह येथे हिना मेश्राम ह्या मुलीची छेड काढून हत्या करण्यात आली.या तिन्ही घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी कामठी शहर च्या वतीने आज तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्रीना सामूहिक निवेदन सादर करीत या गुन्ह्यातील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.आरोपीना लवकरात लवकर फाशी न दिल्यास संपुर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन करणार असल्याचा ईशारा सुद्धा शहराध्यक्ष दीपक वासनिक यांच्या नेत्रुत्वात व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदन सादर निवेदनातुन देण्यात आले.
…महाराष्ट्रातील नांदेड जिल्हय़ात बोन्ढार हवेली या गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी का केली या आकसापोटी सवर्ण समाजातील गुंडांनी अक्षय भालेराव या गरीब कुटुंबातील तरुणाची घरात घुसून हत्त्या केली ही घटना फुले शाहु शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेबांच्या विचाराच्या महाराष्ट्राला कलंकित करणारी आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणे हा गुन्हा कसाकाय ठरू शकतो
…त्याचप्रमाणे अकोला जिल्यातील हीना मेश्राम ही मुंबईत मंत्रालयाच्या जवळ असलेल्या सावित्रीबाई फुले वस्तीगृहात इंजिनियर चे प्रशिक्षण घेत असलेली तरुणीवर तेथील गार्ड व ईतर चार जणानी पाशवी बलात्कार करून तिची हत्त्या केली ही घटना तर कुन्भकर्नी झोपेत असलेल्या मस्तावलेल्या सरकारला काळे फासन्यासारखी आहे .नांदेड येथील मातंग समाजाच्या वस्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला या तीन्ही घटना घडुन पंधरा दिवस झाले असुनही या ठिकाणी आजपर्यंत एकही आमदार खासदार मंत्री किंवा प्रशासणातला पोलीस वीभागातला मोठा अधिकारी गेला नाही की साधी चौकशीही केली नाही स्वताहाला खूब महान व हुशार समजणारे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी तिन्ही घटनानाबाबत ब्र.सुद्धा काढला नाही यावरून हे सरकार दलित अत्याचाराबाबत गंभीर नाही की आरोपींना वाचवण्यासाठी सारी शक्ती लावत आहे का असा प्रश्न दलित समाजासमोर पडत आहे
….या तिन्ही घटनेच्या निषेधार्थ आज कामठी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पदाधिकारी नरेश वाघमारे ,जिल्हा पदाधिकारी प्रशांत नगरकर व कामठी शहराध्यक्ष दीपक वासनिक यांच्या नेत्रुत्वात सरकारच्या व प्रशासनाच्या व आरोपींच्या विरोधात तिव्र घोषणाबाजी करत आरोपींना तात्काळ अटक करून फाशी द्यावी हे प्रकरण फास्ट ट्र्याक कोर्टात चालवून अँड उज्वल निकम यांना पीडितांच्या बाजुने नियुक्त करावे.दोन्ही कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी दोन्ही कुटुंबाला प्रत्येकी 50लाख रु आर्थिक मदत द्यावी. सावित्रीबाई फुले वस्तीग्रुहाचे संचालक व अधिक्षकावर 302ची केस लावुन आजन्म कारावासाची शिक्षा द्यावी. अशाप्रकारचे निवेदन देत सरकारने याकडे गंभीरतेणे पाहून कारवाई केली नाही तर संपुर्ण दलित समाज भाजप सरकारला सत्तेच्या खाली खेचल्याशीवाय राहणार नाही असा इशारा कामठी शहराध्यक्ष दीपक वासनिक यांनी दिला आहे
निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश वाघमारे, जिल्हा महासचिव प्रशांत नगरकर, कामठी शहराध्यक्ष दीपक वासनिक,प्रवक्ता यशवंत शेंडे, सुदेश श्यामकुवर,रवी वानखेडे, धर्मराज राऊत,राजकुमार गवरे,तुषार खोब्रागडे,पोर्नोमा खोब्रागडे ,अविनाश सूर्यवंशी,संजीवनी मेश्राम,अजय मेश्राम,जगदीश रंगारी,राजेश ढोके, विरसेन गेडाम,अविनाश गजभिये यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते