संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 18 :- संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राजस्थान मधील जालौर जिल्ह्यातील सायला क्षेत्रातील सुराणा येथील सरस्वती विद्यालय येथे शिक्षण घेत असलेला 9 वर्षीय तिसऱ्या वर्गातील मेहतर ( दलित ) समाजातील विद्यार्थी इंद्र मेघवालला तहान लागली असता याने सवर्ण मुख्याध्यापक छइलसिंह याच्या माठातील पाणी पिले म्हणून मनुवादी वृत्ती असलेल्या शिक्षकाने अमानुषपणे जबर मारहाण करून जीव घेतला . अशा प्रकारच्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या शिक्षकाला हत्या व एट्रोसीटी गुन्हा अंतर्गत फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये केस लावून कठोर अशी शिक्षा देण्यात यावी जेणेकरून या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही तर या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी कामठी च्या वतीने तहसीलदार मार्फत राजस्थानच्या मुख्यमंत्री ला सामूहिक निवेदन सादर करण्यात आले तसेच मृतक इंद्र मेघवाल च्या परिवाराला राजस्थान सरकारने 50 लाख रुपयांची भरपाई देत कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी अन्यथा आंदोलन पूकारण्यात येणार असल्याचा ईशारा सुद्धा देण्यात आला ..
निवेदन देताना शहर अध्यक्ष दीपक वासनिक,नरेश वाघमारे,अविनाश गजभिये, राजेश ढोके, शकील अहमद आदी उपस्थित होते.