दसरा मेळावे त्यावर वैतागवाडीकर निखिल वागळे

बाळासाहेब ठाकरे जहाल हिंदुत्ववादी प्रखर मराठी प्रेमी आणि पत्रकार निखिल वागळे पक्के समाजवादी त्यामुळे या दोघात विस्तव देखील जात नव्हता हेच वास्तव आहे, वागळे यांनी मित्राची जागा बळकावून त्या जागेत आपले कार्यालय थाटले आणि तेथूनच त्यांनी महानगर हे सायं दैनिक सुरु केले ज्यावेळी स्वतः बाळासाहेब लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर विराजमान होते कारण त्यांची शिवसेना राज्याच्या कानाकोपऱ्यात फोफावली होती पसरली होती राज्यातले घराघरातले बेरोजगार पण धाडसी मराठी तरुण रस्त्यावर उतरून थेट बाळासाहेबांच्या या आक्रमक सेनेत दाखल झाले होते याच उत्साही आणि लढवय्या तरुणांनी त्यावेळी शिवसेना मुंबईपासून तर राज्याच्या कानाकोपऱ्यात डोक्यावर घेतली होती, विदर्भ मराठवाडा खान्देश मुंबई ठाणे कोकण असा कोपरा नव्हता जेथे बाळासाहेब आणि शिवसेना डोक्यावर घेतल्या जात नव्हती त्यावेळी म्हणजे 1990 ते 1995 दरम्यान सर्वात आधी जेव्हा समाजवादी निखिल वागळे यांनी थेट बाळासाहेब त्यांचे नेते आणि शिवसेनेवर मोठे शाब्दिक हल्ले चढवायला सुरुवात केली विशेषतः राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन बाळासाहेबांवर आपल्या भाषणातून शब्दांचे जहरी हल्ले करायला सुरुवात केली त्याला जशास तसे प्रत्युत्तर म्हणून कधी सामना मार्मिक या वृत्तपत्रातून तर कधी हुल्लडबाज शिवसैनिकांमार्फत मग ठाकरे यांनी देखील वागळे यांच्यावर आणि त्यांच्या वृत्तपत्रावर हल्ले करयला सुरुवात केली आणि मी त्यावेळेचे माझे काही मित्र म्हणजे सुरेश गंभीर प्रकाश आयरे मुकेश पटेल इत्यादींना अगदी निक्षून वारंवार सांगितले कि निखिल वागळे यांच्या बोलण्या लिहिण्याकडे बाळासाहेबांना दुर्लक्ष करायला सांगा पण ठाकरेंनी माझे ऐकले नाही, नेमके तेच घडले त्यातून वागळे पत्रकार म्हणून मोठे झाले आणि वेळोवेळी त्यांनी सेनेची लक्तरे काढल्याने बाळासाहेब व शिवसेना बदनामीच्या खाईत सापडली….

जेव्हा वागळे सेनेवर तुटून पडत होते तेव्हा ते मोठे झाले आणि अलीकडे जेव्हा याच वागळेंनी सेनेची सतत तळी उचलायला सुरुवात केली अक्षरश: वागळे यांचा आणि त्यांच्या पत्रकारितेचा देखील राजाचा रंक झाला, जेथे वागळेंना आम्ही सोने वाचतांना पाहिले आज त्याच निखिलला त्यांच्या दुर्दैवाने आणि कर्माने आम्ही गवऱ्या वेचतांना बघतो आहे. डर्टी पिक्चर या सिनेमात त्या सिनेमातली नटी सुरुवातीला लोकप्रियतेच्या शिखरावर उभी असते तिला पैसा आणि सिनेमे प्रसिद्धीच्या झोतात आणून सोडतात पुढे केलेल्या चुकांतून याच नटीला थेट ब्लु फिल्म्स मध्ये काम करून गुजराण कारवी लागते, निखिल वागळे आणि सिल्क स्मिता या दोघात मला हे असेच कमालीचे साम्य जाणवते म्हणजे एकेकाळी मोठ्या वाहिन्यांचा बिग बॉस निखिल वागळे, क्रमाक्रमाने विविध विकृतींमधून एवढा खाली आला कि त्याचा आज थेट अनिल थत्ते झाला आहे,वाईट वाटते जेव्हा पत्रकारितेचे हिडीस रूप मुद्दाम अंगिकारल्यानंतर जे वागळे किंवा थत्ते यांचे होते. आज आहे त्यापेक्षा पत्रकारितेतला अधिक दर्जा वागळे यांचा घसरला आणि त्यात वेड लागून जर हेच वागळे शिवाजी पार्कात घिरट्या घालतांना कपडे फाडतांना दिसले तर निदान मला तरी फारसे आश्चर्य वाटणार नाही. एकेकाळच्या कट्टर समाजवादी निखिल वागळे यांनी जेव्हा आपल्या बोलण्यातून कधी ज्या शिवसेनेवर तोफ डागली काल किंवा अलीकडे तेच वागळे जेव्हा चुकीच्या वागणार्या उद्धव ठाकरे यांना प्रचंड डोक्यावर घेतात पुनःपुन्हा मला नटी सिल्क स्मिताची हमखास आठवण येते होते….

यावेळी शिवाजी पार्कात उद्धव यांच्या सेनेचा आणि आझाद मैदानात एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा जो दसरा मेळावा पार पडला त्यावर वागळे यांनी आपल्या व्हिडीओ मधून अत्यंत बालिश अशी त्या शिंदे यांच्यावर टीका करून उद्धव कसे मोठे त्यावर शाब्दिक आटापिटा करीत अनेकांचे मनोरंजन केले अर्थात मला तर वागळे वेडे झाले असावे असेच मनापासून वाटले, अनिल थत्ते निखिल वागळे एकाच माळेचे मणी वाटले कारण वडिलांच्या पुण्याईवर पैशांनी आणि नेतृत्वात आयतेच मोठेपण प्राप्त केलेल्या उद्धव ठाकरे हे काल पर्वा ज्यांनी बाहेर पडून बंड करून हिम्मत दाखवत प्रति शिवसेना उभी केली त्या एकनाथ शिंदे यांच्याशी उद्धव यांची तुलना करीत उद्धव प्रत्येक बाबतीत एकनाथ शिंदेपेक्षा मोठे व श्रेष्ठ कसे हे जेव्हा जिवाच्या आकांताने निखिल यांनी सांगितले, वागळे वेडे झाले असे माझे ठाम मत झाले कारण पिटी उषाच्या संगें वागळे यांनी बालवाडीतल्या खेळाडूची तुलना केली, आणखी काही काळ गेल्यानंतर एकनाथ शिंदे देखील उद्धव ठाकरेंपुढे नक्की निघून जातील पण आज अगदी सुरुवातीच्या वर्ष दोन वर्षांचा कालावधी उलटला असतांना थेट उद्धव ठाकरे यांना तेही थेट दसऱ्याच्याच दिवशी एकनाथ शिंदे अगदी मुंबईत आव्हान देत स्वतःच्या हिंमतीवर आव्हान देत प्रति मेळावा बऱ्यापैकी यशस्वी करून दाखवतात थोडक्यात प्रायमरी शाळेतला विद्यार्थी जेव्हा निष्णात पैलवानाला आव्हान देऊन त्याला तोंडावर पाडून मोकळा होतो, वागळे अशावेळी तुम्ही जेव्हा शिंदे ऐवजी उद्धव यांची बाजू घेऊन अनेक गंभीर चुका करणाऱ्या उद्धव यांना म्हणजे त्याच बाळासाहेबांच्या अयशस्वी चिरंजीवाला पाठीशी घालता, तुमची आणि तुमच्या घसरलेल्या पातळीची पत्रकारितेची मनापासून कीव करावीशी वाटते….

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तहसील कार्यालयावर कांग्रेसचा विशाल धड़क मोर्चा

Thu Oct 26 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रलंबित न्यायिक मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी कामठी तालुका व शहर कांग्रेस कमिटीच्या वतीने आज 26 ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता कामठी तहसील कार्यालयावर विशाल धडक मोर्चा काढून प्रशासन विरोधात नारेबाजी दर्शवून तहसील प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले तसेच या धडक मोर्च्यातून कामठी तहसीलदार विरोधात प्रचंड रोष व्यक्त करीत नागरिकांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com