संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधि
कामठी – प्रबुद्ध नगर कामठी स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समीती च्या परिसरात संग्राहक दिलिप वानखेड़े द्वारा संचालित बौद्ध इतिहास संस्कृति संशोधन संस्था नागार्जुन संग्रहालय कामठी-पुणे च्या वतीने वैशाख त्रिविध बुद्ध पोर्णिमा निमित्त व जागतीक संग्रहालय दिना निमित्त तथागत बुद्धाच्या विविध भावमुद्रेतील मुर्त्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र जिवनप्रवासातील विविध भावमुद्रा अंसलेल्या तैलचित्राचे प्रदर्शन लावण्यात आले असुन परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थीत राहून प्रदर्शनीचे अवलोकन केले.
उपरोक्त कार्यक्रमा चे उद्घाटन कल्पना ताई दिलीप वानखेड़े यांच्या हस्ते झाले कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी पुर्व मुख्याध्यापक ना गो भगत सर हे होते नागार्जुन संग्रहालय कामठी-पुणे चे मुख्य प्रवर्तक भदंत नाग दिपंकर स्थविर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात अतीधी म्हणुन पुर्व नगराध्यक्ष प्रमोद मानवटकर उपस्थीत होते प्रदर्शनी ची उत्तम मांडणी हर्षवर्धन वानखेडे यांनी केली संचालन प्रमोद क”कुंभारे यांनी केले उपरोक्त कार्यक्रमाच्या यशस्वी ते करीता पुतळा सौंदर्यीकरण समीती चे विरेद्र पानतावने मोहन सातपुते विनोद चव्हाण राजेश वाघमारे नंदकीशोर मेश्राम सुरज टेंभुर्णे पुणेश नगरारे अंजन डंभारे राकेश कनोजीया राकेश सवाईतुल हरीदास चांदेकर जयचंद पाटील जनार्दन मेंढे अवि अशोक वाजपेई सिद्धार्थ गजभिए गुलाबराव वासनीक प्रमोद टेंभुर्णे शुद्धोधन पाटिल यांनी मोलांची भूमिका साकारली.