वैशाख बुध्द पौर्णिमा व त़थागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी

– कन्हान शहर विकास मंच द्वारे बुद्ध जयंती साजरी

कन्हान :- वैशाख बुध्द पौर्णिमा आणि अवघ्या विश्वा ला शांततेचा संदेश देणारे.. दया, क्षमा, शांततेची शिक वण देणारे तथागत गौतम बुद्ध यांची २५६८ वी जयंती कन्हान शहर विकास मंच द्वारे गणेश नगर येथे कन्हान बुद्ध बिहारात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे मार्गदर्शक भरत सावळे आणि सदस्य अभिषेक चवरे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी भरत सावळे, अर्जुन पात्रे यांनी तथागत गौतम बुद्ध यांचा जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन करुन बुध्द जयंतीच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित सर्व शहर विकास मंच पदाधिका-यानी व सदस्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, प्रदीप बावने, सुरज वरखडे, अर्जुन पात्रे, माहेर इंचुलक र, अभिषेक चवरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बनावट सिमकार्डना आळाः दूरसंचार विभागाने 6.80 लाख संशयित कनेक्शनना फेर-पडताळणीसाठी केले लक्ष्य

Fri May 24 , 2024
– बनावट कागदपत्रांद्वारे मिळवलेली मोबाईल कनेक्शन खंडित करण्याचे दूरसंचार विभागाचे उद्दिष्ट नवी दिल्‍ली :- दूरसंचार विभागाने 6.80 लाख मोबाईल कनेक्शनवर लक्ष केंद्रित केले असून ही कनेक्शन्स अवैध, अस्तित्त्वात नसलेल्या किंवा ओळखीचे बनावट/फेरफार केलेल्या पुराव्यांच्या आणि पत्त्यांच्या केवायसी कागदपत्रांचा वापर करून मिळवल्याचा संशय आहे. **प्रमुख वैशिष्ट्ये:** संशयित बनावट कनेक्शन्स ओळखणे – आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विश्लेषणाच्या माध्यमातून, दूरसंचार विभागाने संभाव्य गैरप्रकार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!