वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईनकरिता गडचिरोली तालुक्यातील रेल्वे भुसंपादन जमीन खरेदी प्रक्रिया सुरु

सतीश कुमार,गडचिरोली

जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप

गडचिरोली,(जिमाका)दि.16: विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांचे कार्यालय अंतर्गत वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकरिता मौजा काटली, साखरा, महादवाडी, अडपल्ली, गोगाव, लांझेडा, गडचिरोली व मोहझरी पॅच येथील रेल्वे प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या खाजगी जमिनीचे भुसंपादन काम सुरू आहे. त्याअंतर्गत विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, गडचिरोली यांचे कार्यालयाकडून दिनांक 11.03.2022 पासून वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकरीता जमीन भुसंपादनबाबत संबंधित भुधारकांकडून खरेदीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. त्यानुसार दिनांक 11.03.2022 रोजी मौजा अडपल्ली येथील माणिकदास धर्मा शेंडे, मारोती गोपाळा मुप्पीडवार व गिरीधर लटारू चौधरी यांचे जमीनीचे भुसंपादन करण्याबाबत दुय्यम निबंधक, गडचिरोली यांचे कार्यालयात नोंदणीकृत खरेदीखत तयार करण्यात येऊन व दिनांक 14.03.2022 रोजी जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांचे हस्ते संबंधितास धनादेश वितरीत करण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी, गडचिरोली आशिष येरेकर हे उपस्थित होते. वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन करिता गडचिरोली तालुक्यातील रेल्वे भुसंपादनमध्ये जमीन खरेदी करणे सुरु झालेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची जमीन लवकरच पुर्ण करण्यात येणार आहे असे विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी (कवठा)म्हसाळा ग्रा प चे प्रभारी सरपंच अपात्र घोषित

Wed Mar 16 , 2022
संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 16 :- 26 सप्टेंबर 2018 ला झालेल्या ग्रा प सार्वत्रिक निवडणुकीत (कवठा)म्हसाळा 12 सदस्यीय ग्रा प मध्ये सरपंच पदी अनिता धर्मराज आहाके तर उपसरपंच पदी शरद माकडे निवडून आले होते .दरम्यान गावातील शासकीय पांधण रस्त्यावर अवैधरित्या अतिक्रमण करून घर बांधल्याप्रकरनी 20 फेब्रुवारी 2019 ला सरपंच अनिता आहाके व सदस्य (सरपंच पती)धर्मराज आहाके हे अपात्र घोषित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com