संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 14:- कोरोना काळानंतर प्रथमच दोन वर्षानंतर हज यात्रेसाठी सौदी अरब यांचेकडून परवानगी मिळाल्यानंतर कामठी शहरातील 80 च्या जवळपास हज यात्रेकरूंची निवड झाली असून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामठी तर्फे हजयात्रेकरूंना हुतात्मा स्मारक कामठी च्या सभागृहात मेनिंगोकोकल व ओरल पोलिओ चे लसीकरण देण्यात आले..याप्रसंगी हाजी कमिटी कामठी चे तंझीम खद्दामूल हाजी, हाजी राशीद, मतीन सलाफ शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या लसीकरण कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी , रंजना कवरती, शुभांगी भोकते, स्वीटी रामटेके ,नीलम खोब्रागडे यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष आरोग्य सेवा पुरविली .
हज यात्रेस जाणाऱ्या यात्रेकरूंचे लसीकरण
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com