– RabiesMuktNagpur:रेबीज विरुद्धच्या लढाईत गेम-चेंजिंग यश
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या मिशन रेबीजच्या सहकार्याने सुरू असलेल्या रेबीज मुक्त नागपूर (#RabiesMuktNagpur) मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मगील सप्टेंबर महिन्यात राबविण्यात आलेल्या सामूहिक श्वान लसीकरण मोहिमेअंतर्गत २० हजार ३९२ श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली, विशेष म्हणजे, या मोहिमेच्या अवघ्या १५ दिवसांत १५ हजार श्वानांचे मूळ उद्दिष्ट ओलांडून २० हजार ३९२ श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली.
या रेबीज मुक्त नागपूर मोहिमेचे यश हे रेबीजचे उच्चाटन आणि निरोगी, सुरक्षित नागपूर घडविण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे,”असे प्रतिपादन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले असून, मोहिमेच्या यशाबद्दल विभागाचे अभिनंदन केले आहे.
नागपूर महानगरपालिका, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि निर्मिती पीपल्स अँड अॅनिमल वेलफेअर सोसायटी (NPAWS) यांच्या एकत्रपणे ही मोहीम राबविण्यात आली. तसेच 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिनी मोहिमेला समारोप झाला. लसीकरण मोहिम दोन विभागात राबविण्यात आली. पहिल्या १५ दिवसांत नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय विद्यार्थी, श्वान पकडणारे आणि मिशन रेबीज आणि होप अँड अॅनिमल ट्रस्टचे लसीकरण करणारे अशा नऊ पथकांनी अथक परिश्रम घेत १७ हजार ३९२ श्वानांचे लसीकरण केले. या यशानंतर दोन पथकांनी उर्वरित ३००० श्वानांचे लसीकरण करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आणि आपले ध्येय गाठले”, अशी माहिती डब्ल्यू व्ही एस मिशन रेबीजचे विशेष कार्य संचालक डॉ. शशिकांत जाधव यांनी सांगितले.
लसीकरण मोहिमे बरोबरच रेबीज प्रतिबंधात्मक उपाय तसेच पाळीव प्राण्यांचा जबाबदारीने सांभाळ करण्याबाबत स्थानिक समुदायांना शिक्षित करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. मिशन रेबीज शिक्षणाधिकाऱ्यांनी २० शाळांमध्ये जाऊन २,६७३ विद्यार्थी आणि १६४ शिक्षकांना माहिती दिली आणि २७ स्थानिक समुदायांना सहभागी करून घेतले, ज्या मधुन एकूण १,७७९ व्यक्तींनी सहभाग नोंदविला.
रेबीज मुक्त नागपूर हे सामायिक ध्येय साध्य करण्यासाठी स्थानिक सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि सामुदायिक भागीधारकांच्या एकत्रितपणे प्रयत्न केले. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए. पी. सोमकुवर यांच्या सहकार्या बद्दल आणि या मोहिमेत ३८ पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागास प्रोत्साहन दिल्या बद्दल त्यांचे विशेष आभार जाधव यांनी व्यक्त केले आहे.
तसेच एनपीए डब्ल्यू एस नागपूरचे अध्यक्ष डॉ. राहुल एस. बोंबटकार यांचे समर्पण हे मोहिम यशस्वी होण्यात मोलाचे वाटेकरीआहे”, असे डॉ. शशिकांत जाधव यांनी सांगितले. रेबीज निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवून नागपूर महानगरपालिकेने या मोहिमेचा विस्तार करण्याचा निर्धार केला आहे.
अधिक माहितीसाठी, संपर्क:
डॉ.शशिकांत जाधव ९७६३६८१४८९
डॉ. राहुल बोंबटकार ७०२८३११११३